Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पावसामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांचे नुकसान, मंडपाच्या ठिकाणी चिखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 21, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
पावसामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांचे नुकसान, मंडपाच्या ठिकाणी चिखल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईत मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात पाणी साचले होते. पाण्याचा निचरा झाल्यांनतर आता त्याठिकाणी चिखल झालेला आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नयेत यासाठी महापालिकेने तातडीने संबंधित ठिकाणी धूर आणि औषध फवारणी करावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

मुंबईत नुकतेच अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे मंडपातून आगमन झाले. मात्र, पावसामुळे मंडपाच्या ठिकाणी पाणी साचले असून चिखल झाला आहे. यामुळे येथे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. पालिकेने ही बाब लक्षात घेऊन तातडीने धूर फवारणी आणि साथरोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी करावी, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. संबंधित ठिकाणी औषध फवारणी केल्यास साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टळू शकेल, असे ॲड. दहिबावकर यांनी सांगितले.

Previous Post

माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा प्रश्न

Next Post

प्रेमाला विरोध केल्याने प्रेयसीच्या भावाचा खून, पोलिसांकडून तिघांना अटक

Next Post
प्रेमाला विरोध केल्याने प्रेयसीच्या भावाचा खून, पोलिसांकडून तिघांना अटक

प्रेमाला विरोध केल्याने प्रेयसीच्या भावाचा खून, पोलिसांकडून तिघांना अटक

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.