Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 14, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी भाषेच्या मुद्द्यांवरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलेलं आहे. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत एक मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मात्र, याच भाषणात राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलिकडेच मुंबईत केलेल्या एका जाहीर भाषणादरम्यान एका वक्तव्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. दरम्यान, मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून परप्रांतीयांना मारहाण करण्यात आल्याच्या काही घटना घडल्या होत्या. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते.

त्यानंतर या घटनेवरून भाजपा आणि मनसेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारणही रंगलं होतं. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाषणात बोलताना म्हटलं होतं की, ‘मारहाण करताना व्हिडीओ रेकॉर्ड करू नका.’ राज ठाकरे यांचं हे विधान द्वेषपूर्ण आणि भडकाऊ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस महासंचालकाकडे तीन वकिलांनी लेखी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीत राज ठाकरे यांचे काही विधाने सामाजिक अशांततेला प्रोत्साहन देणारे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी भाषणात केलेल्या परप्रांतीयांबाबतच्या विधानामुळे राज्यातील सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मीरा भाईंदर येथील घटनेचा संदर्भ देत परप्रांतीयांबाबत सांगत उठसूट मारायची गरज नाही. मात्र, जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Previous Post

घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून तब्बल ५२८५ घरांसाठी लॉटरी

Next Post

“३ वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होईल स्फोट”, पहाटे धमकीचा ईमेल

Next Post
“३ वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होईल स्फोट”, पहाटे धमकीचा ईमेल

“३ वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होईल स्फोट”, पहाटे धमकीचा ईमेल

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.