Lokrakshanay
Friday, August 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून तब्बल ५२८५ घरांसाठी लॉटरी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 14, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून तब्बल ५२८५ घरांसाठी लॉटरी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : प्रत्येकाचे स्वतः चे घर असावे असे स्वप्न असते. परंतु सध्या महागाई एवढी वाढत आहे की घर खरेदी करणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटबाहेर गेले आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याचा अनेकजण विचारदेखील करत नाहीत. परंतु आता तुमच्याकडे घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. म्हाडाने तब्बल ५ हजारांपेक्षा जास्त घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर आणि जिल्हा येथील घरांसाठी ही सोडत जाहीर केली आहे. याचसोबत वसई (जिल्हा पालघर) येथील घरांसाठीही सोडत जाहीर केली आहे.

याअंतर्गत ओरोस, कुळगाव-बदलापुर येथील ७७ भूखंडदेखील विक्रीसाठी आहेत. एकूण ५२८५ सदनिकांसाठी आणि ७७ भूखंडासाठी ही सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे जर हक्काचे घर घ्यायचे असेल तर ही उत्तम संधी आहे. म्हाडाच्या या सोडतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या सदनिकांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०२५ आहे. तर रक्कम भरण्याच तारीख १४ ऑगस्ट २०२५ आहे. या सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची यादी २१ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. यानंतर तुम्हाला २५ ऑगस्ट रोजी प्रारुप यादीवर दावे किंवा हरकती नोंदवता येणार आहे. १ सप्टेंबरला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी जाहीर केली जाईल. यानंतर ३ सप्टेंबर रोजी सोडत जाहीर केली जाईल. ही सोडत ऑनलाइन पद्धतीने जाहीर करणार असून ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे केली जाणार आहे. म्हाडाने अर्जप्रक्रियेबाबत माहिती दिली आहे. ही लॉटरी प्रक्रिया पूर्णपण ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे कोणत्याही एजंट किंवा दलालावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला IHLMS 2.0 या प्रणालीवरुन किंवा अॅपद्वारे अर्ज करता येणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

Previous Post

“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी

Next Post
राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी

राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी

BreakingNews

आता प्रत्येक आमदाराला मिळणार हक्काची गाडी आणि दरमहा १ लाख रुपये; तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

FDAच्या कडक कारवाईचा परिणाम; चायनीजमध्ये लाल रंगासाठी आता बीट आणि काश्मिरी मिरचीचा वापर

ठाण्यात आरटीओचे ‘मिशन मराठी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी ६ ठिकाणी तपासणी मोहीम!

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच धावणार १५० नवीन आलिशान डबलडेकर एसी बसेस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.