Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश; मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांतील अनधिकृत फलकांवर कारवाई करा

मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग) लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून परवाना न घेतलेल्या सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 15, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग) लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून परवाना न घेतलेल्या सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी दिले. घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली, त्याठिकाणी आयुक्त गगराणी यांनी मंगळवारी भेट देवून मदत कार्याची पाहणी केली. संपूर्ण परिसराची पाहणी करतांनाच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी दुर्घटनेशी संबंधित तपशील जाणून घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. या पाहणीप्रसंगी सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त रमाकांत बिरादार, उपआयुक्त किरण दिघावकर, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे उपस्थित होते.

यावेळी गगराणी म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. विनापरवाना तसेच धोकादायक स्थितीतील जाहिरात फलकांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छेडा नगर येथे दुर्घटना घडलेल्या ठिकाणी असलेल्या अन्य तीन अनधिकृत फलकांवरही तत्काळ निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेची विहित परवानगी न घेता जाहिरात फलक उभारल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. जमीन मालकी कोणाचीही असली तरीही व्यवसायासाठी परवाना घेऊनच जाहिरात फलक लावणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करून लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या जागेतील अनधिकृत जाहिरात फलक तसेच परवाना या मुद्द्यावर वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रशासनाने पाठपुरावा केल्याचेही आयुक्त गगराणी यांनी सांगितले.

Previous Post

विरोधी पक्षांकडून संविधान बदलले जाणार असल्याचे सांगत समाजाची दिशाभूल; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हल्लाबोल

Next Post

केंद्रावर रुग्णांना मोफत मार्गदर्शन; ठाणे जिल्ह्यात प्रथमच कर्करोग माहिती केंद्र

Next Post
केंद्रावर रुग्णांना मोफत मार्गदर्शन; ठाणे जिल्ह्यात प्रथमच कर्करोग माहिती केंद्र

केंद्रावर रुग्णांना मोफत मार्गदर्शन; ठाणे जिल्ह्यात प्रथमच कर्करोग माहिती केंद्र

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.