Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ठाण्यातील महाविद्यालयांनी मारली बाजी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 25, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ठाण्यातील महाविद्यालयांनी मारली बाजी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव हा विद्यापीठ स्तरावरील एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि विविध कलांचा मेळ साधणारा महोत्सव आहे. यंदा या महोत्सवाचे ५८ वे वर्ष होते. युवा महोत्सवात विविध कला, साहित्य, संगीत, नृत्य, नाटक आणि इतर विभागातील स्पर्धा पार पडतात. या महोत्सवामध्ये राज्यभरातून महाविद्यालये सहभागी होतात. दरम्यान यंदाच्या युवा महोत्सवातही ठाण्यातील महाविद्यालयांनी सहभाग दर्शवत विभागांतील विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या विद्यापीठांपैकी एक असणाऱ्या मुंबई विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक आणि सांस्कृतिक कौशल्यांचा विकास व्हावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात संगीत, नृत्य, ललित कला, साहित्य आणि नाट्य या विभागातील स्पर्धा पार पडतात. यामध्ये शास्त्रीय, पाश्चात्य, भारतीय असे प्रकार असतात. गायन, वादन, एकांकिका, मिमिक्री, वक्तृत्व, वादविवाद, कोलाज, रांगोळी, मेहंदी, छायाचित्रिकरण अशा विविध स्पर्धांचा यात समावेश असतो. या महोत्सवात मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचे सादरीकरण राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये करता येते. अशातच ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालय, सतीश प्रधान ज्ञानसाधना विद्यालय, शेठ एनकेटीटी महाविद्यालय, बी. एन. बांदोडकर या महाविद्यालयांनी महोत्सवात सहभाग घेतला होता. यंदाही महाविद्यालयांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावत ५८ व्या युवा महोत्सवात बाजी मारली आहे.

Previous Post

भारतीय पर्यटनाला मिळणार नवी दिशा; गेट वे ऑफ इंडियाजवळ आंतरराष्ट्रीय कुझ टर्मिनल

Next Post

महाराष्ट्रातील प्रथम ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षा’ची स्थापना ठाण्यात

Next Post
महाराष्ट्रातील प्रथम ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षा’ची स्थापना ठाण्यात

महाराष्ट्रातील प्रथम ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षा’ची स्थापना ठाण्यात

BreakingNews

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.