Lokrakshanay
Sunday, July 5, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘कॉकरोच जनता पार्टी’चं X अकाउंट भारतात ब्लॉक? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Instagram वर मोठी लोकप्रियता मिळाल्यानंतर नवा वाद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 21, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
‘कॉकरोच जनता पार्टी’चं X अकाउंट भारतात ब्लॉक? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या ‘Cockroach Janata Party’ अर्थात CJP संदर्भात नवी घडामोड समोर आली आहे. Instagram वर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळवत चर्चेत आलेल्या या व्यंगात्मक मोहिमेचे X (पूर्वीचे Twitter) अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट शेअर करत “अपेक्षेप्रमाणे, कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आलं आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध चर्चा आणि प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, X किंवा संबंधित अधिकृत संस्थांकडून यासंदर्भात कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या दाव्याबाबत उत्सुकता आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही अहवालांनुसार, CJP ने Instagram वर १० दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स मिळवत Bharatiya Janata Party च्या अधिकृत अकाउंटलाही फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकल्याची चर्चा सुरू झाली होती. ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही पारंपरिक राजकीय संघटना नसून व्यंग, मीम्स आणि डिजिटल आंदोलन यांचे मिश्रण असलेली सोशल मीडिया मोहीम मानली जात आहे. बेरोजगारी, पेपरफुटी, राजकीय वातावरण आणि तरुणांमधील नाराजी यांसारख्या मुद्द्यांवर ही मोहीम विशेष चर्चेत आली. स्वतःला “तरुणांची, तरुणांसाठी आणि तरुणांनी उभारलेली चळवळ” असे संबोधणाऱ्या या मोहिमेने अल्पावधीतच मोठा डिजिटल प्रभाव निर्माण केला आहे. Instagram आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मोहिमेबाबत मीम्स, प्रतिक्रिया आणि चर्चांचा पूर आला असून, आता X अकाउंट ब्लॉक झाल्याच्या दाव्यानंतर या मोहिमेभोवतीचा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर दणदणाट; १०८ कोटींच्या कमाईसह नवा इतिहास

Next Post

गावदेवी भाजी मंडई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची मदत

Next Post
गावदेवी भाजी मंडई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची मदत

गावदेवी भाजी मंडई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची मदत

BreakingNews

‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेत धडक कारवाई; पुणे-सोलापुरात सव्वा लाखांचा साठा जप्त!

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेनळी घाट ५ दिवस बंद!

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या; संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी महापालिकेचे आवाहन!

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबाला १० लाखांची मदत; दोषींवर कठोर कारवाईचा महापौरांचा इशारा!

शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्हा परिषद शाळांची चमकदार कामगिरी; ५ वी व ८ वीतील ३९५ विद्यार्थी पात्र!

लंडनमध्ये उभारले जाणार ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’ – उदय सामंत यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.