Lokrakshanay
Tuesday, August 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

केंद्र सरकारची नवी ‘BPAN’ प्रणाली

EV बॅटऱ्यांसाठी आता २१ अंकी 'आधार' क्रमांक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 5, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, महाराष्ट्र
केंद्र सरकारची नवी ‘BPAN’ प्रणाली
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) क्रेझ झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता बॅटरीची सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. परिवहन मंत्रालयाने बॅटरीसाठी ‘आधार कार्ड’ सारखा एक विशेष ओळख क्रमांक (ID) देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

बॅटरीच्या उत्पादनापासून ते तिच्या रिसायकलिंगपर्यंत लक्ष ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता बॅटरी उत्पादक कंपन्यांना किंवा आयातदारांना प्रत्येक बॅटरी पॅकसाठी एक युनिक नंबर जारी करावा लागेल. याला ‘बैटरी पॅक आधार नंबर’ (BPAN) असे म्हटले जाईल. हा नंबर २१ अक्षरांचा असेल, जी प्रत्येक बॅटरीची स्वतंत्र ओळख असेल. कंपन्यांना बॅटरीशी संबंधित सर्व ‘डायनॅमिक डेटा’ सरकारच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक असेल. बॅटरीवर हा BPAN नंबर अशा ठिकाणी लावला जाईल जिथून तो सहज पाहता येईल. नियमानुसार, तो अशा स्थितीत ठेवावा लागेल की ज्यामुळे तो खराब होणार नाही किंवा कोणीही तो पुसू शकणार नाही. या नंबरच्या माध्यमातून बॅटरीचा कच्चा माल, निर्मिती प्रक्रिया, वापर आणि शेवटी तिची विल्हेवाट लागेपर्यंतची सर्व माहिती सुरक्षित राहील. जर एखादी बॅटरी रिसायकल करून पुन्हा वापरली गेली, तर तिला नवीन ओळख क्रमांक दिला जाईल, जेणेकरून जुन्या आणि नवीन वापराचा डेटा स्पष्ट राहील. हे नियम प्रामुख्याने इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीसाठी आहेत. मात्र, यामध्ये २ किलोवॉटपेक्षा जास्त क्षमतेच्या औद्योगिक बॅटरींचाही समावेश केला जाऊ शकतो. गाड्या सुरू करण्यासाठी लागणाऱ्या लहान बॅटरी आणि पोर्टेबल बॅटरींना सध्या या नियमातून वगळण्यात आले आहे.

Previous Post

नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास १५ मिनिटांत!

Next Post

राज्यातील बँक कर्मचाऱ्यांची ५ दिवस देशव्यापी संपाची घोषणा

Next Post
राज्यातील बँक कर्मचाऱ्यांची ५ दिवस देशव्यापी संपाची घोषणा

राज्यातील बँक कर्मचाऱ्यांची ५ दिवस देशव्यापी संपाची घोषणा

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.