Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थांना ‘एनर्जी बार’ देणार – केंद्र सरकारचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 5, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थांना ‘एनर्जी बार’ देणार – केंद्र सरकारचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे व विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा याकरीता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थांना पूरक पोषण आहार दिला जातो. याअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक पदार्थ म्हणून एनर्जी बार दिला जाणार आहे. चिक्कीप्रमाणे असलेल्या या एनर्जी बारसाठी पालिका १ कोटी ४१ लाख रुपये खर्च करणार आहे.

केंद्र सरकारच्या पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक (कॅलरी) व १२ ग्रॅम प्रथिने, तर ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनयुक्त भोजन देण्यात येते. मुंबई महापालिकेच्या शाळेतील सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा याकरीता बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक पोषण आहार देण्यात येतो. याकरीता मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. मुंबई महापालिकेचे सुमारे ३ लाख ५२ हजार विद्यार्थी असून त्यांना सुटीचे दिवस वगळून ११२ दिवस एनर्जी बारचा पुरवठा केला जाणार आहे. वि्यार्थ्यांसाठी वर्षभरात ३ कोटी ९५ लाखांपेक्षाही अधिक एनर्जी बारचा पुरवठा करावा लागणार आहे. एनर्जी बारमध्ये शेंगदाणे, गूळ, कुरमुरे, बदाम, सोया प्रोटीन, चणे असून व्हॅनिला, चॉकलेट, कॅरेमल अशा तीन स्वादांमध्ये एनर्जी बार दिले जाणार आहेत. पंचवीस ग्रॅमचे दोन एनर्जी बार दिले जाणार आहेत.

Previous Post

सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४: राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान

Next Post

दत्त जयंतीनिमित्त ठाण्यातील ११३ वर्षे प्राचीन मंदिरात भाविकांची गर्दी!

Next Post
दत्त जयंतीनिमित्त ठाण्यातील ११३ वर्षे प्राचीन मंदिरात भाविकांची गर्दी!

दत्त जयंतीनिमित्त ठाण्यातील ११३ वर्षे प्राचीन मंदिरात भाविकांची गर्दी!

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.