Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

RBI ची मोठी कारवाई ! ‘या’ बँकेचा परवाना रद्द तर 4 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 24, 2023
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
RBI ची मोठी कारवाई ! ‘या’ बँकेचा परवाना रद्द तर 4 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : देशातील बँकांवर नियंत्रण ठेवणारी सर्वात मोठी बँक आरबीआय ने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत केरळमधील अनंतशयनम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकेचा परवाना रद्द केला आहे. तर दुसरीकडे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार बँकांना मोठा दंडही ठोठावला आला आहे.आम्ही तुम्हाला सांगतो की अनेकदा आरबीआय ग्राहकांची सुरक्षा आणि नियम लक्षात घेऊन बँकांच्या त्रुटींच्या आधारे कारवाई करते.
बँकेचा परवाना रद्द, आरबीआयने जारी केली नोटीस..
अनंतशयनम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 19 डिसेंबर 1987 रोजी परवाना देण्यात आला होता, जो RBI ने रद्द केला आहे. सेंट्रल बँकेने बँकिंग नियमन कायदा 1949 मधील कलम 56 आणि कलम 36A (2) अंतर्गत ही कारवाई केली आहे.
बँकेला आता बँकिंग व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तथापि, बँक अद्याप एक नॉन-बँकिंग संस्था म्हणून काम करू शकते. गैर-सदस्यांकडून ठेवी तत्काळ प्रभावाने प्रतिबंधित आहेत. यानंतरही, रिझर्व्ह बँकेच्या मागणीनुसार, या बँकेला सभासद नसलेल्यांची न भरलेली आणि दावा न केलेली रक्कम परत करावी लागेल.
या बँकांना दंड ठोठावला
RBI ने श्री वारणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (कोल्हापूर, महाराष्ट्र) वर “ठेव खात्यांची देखभाल – प्राथमिक सहकारी बँका” संबंधी निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (लखनऊ, यूपी) वर कर्ज आणि अॅडव्हान्सशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 11 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (मुंबई, महाराष्ट्र) वर “ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी योजना, 2014” शी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. द सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (जम्मू) ला 6 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे बँक आणि ग्राहक यांच्यात होणाऱ्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही.

Previous Post

‘माहेरची साडी’ हा चित्रपट अलका कुबल यांना कसा मिळाला होता ? हे पाहूया

Next Post

“शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल पुढल्यावर्षीचं…”

Next Post
“शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल पुढल्यावर्षीचं…”

“शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल पुढल्यावर्षीचं...”

BreakingNews

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.