Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; शाळा आणि पोलिसांवर पालकांनी केला आरोप

बदलापूरचं प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी एका महिला पोलिसाने शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 23, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; शाळा आणि पोलिसांवर पालकांनी केला आरोप
Share on FacebookShare on Whatsapp

बदलापूर : बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. १३ ऑगस्टला घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी बदलापूरमध्ये २० ऑगस्टला प्रचंड जनक्षोभ उसळला होता. बदलापूरमध्ये रेल रोकोही करण्यात आला. या प्रकरणी आता पीडितेच्या पालकांनी शाळा आणि पोलिसांवर आरोप केला आहे. बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य केलं. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १३ ऑगस्टला सफाई कामगाराने दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार केले. यातील एकीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तपासणीनंतर तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाल्याची बाब समोर आली. १६ ऑगस्ट रोजी पालक तो अहवाल घेऊन शाळेत गेले.

मात्र शाळेने सायकलमुळे जखम झाली असावी किंवा शाळेबाहेर काही घडले असावे, असे निरर्थक दावे करत अहवाल फेटाळून लावला असं पालकांनी सांगितलं आहे. तसंच या प्रकरणात गंभीर आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे. शाळा प्रशासनाने आम्ही दाखवलेला अहवाल फेटाळला. त्यानंतर आम्ही तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो. तिथे आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी १२ तास लावले. बदलापूर प्रकरणात मनसे नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आपल्या वक्तव्यात अनेक बदल केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, असा इशारा दिल्याचाही पालकांचा आरोप आहे. याच बरोबर आणखी एक आरोप पालकांनी केला आहे. बदलापूरचं प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी एका महिला पोलिसाने शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. बदलापूरचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचं पीडित मुलीच्या पालकांनी म्हटलं आहे. आता ही महिला पोलीस अधिकारी कोण हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

Previous Post

फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून दोन महिन्यांत दिली आरोपीला फाशी : एकनाथ शिंदे

Next Post

पुण्यातील रस्ते खड्डे होणार मुक्त; खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी ॲप सुरू…..

Next Post
पुण्यातील रस्ते खड्डे होणार मुक्त; खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी ॲप सुरू…..

पुण्यातील रस्ते खड्डे होणार मुक्त; खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी ॲप सुरू.....

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.