Lokrakshanay
Thursday, August 13, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आशिष शेलार यांची मागणी; नालेसफाईच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढा, महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे

मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून ७५ टक्के गाळ काढल्याचा दावा केला असून हे नालेसफाई कामांबाबत केलेले दावे खोटे आहेत असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 21, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
बांधकामे रोखण्याचा आयुक्तांचा इशारा, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना; बांधकामांबाबत पालिकेच्या सूचना
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून ७५ टक्के गाळ काढल्याचा दावा केला असून हे नालेसफाई कामांबाबत केलेले दावे खोटे आहेत असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. या नालेसफाई कामांबाबत आपण असमाधानी आहोत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी नाल्यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच नालेसफाईच्या कामाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. लोकसभेच्या निवडणूकीसाठीचे मतदान संपल्यानंतर आता पावसाळापूर्व कामांची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील गझधर बांध जंक्शन, साऊथ ॲव्हेन्यू, नाँर्थ ॲव्हेन्यू, एसएनडीटी नाला येथील नालेसफाई कामाची पाहणी केली. अद्याप समाधानकारक कामे झालेली नाहीत, असे मत व्यक्त केले.

यावेळी आशिष शेलार म्हणाले की, मुंबई शहरात मोठे छोटे अरुंद असे नाले दोन हजार किलोमीटर पर्यंतचे आहेत. नालेसफाईसाठी गेल्यावर्षीच्या अनुभवाच्या आधारे अडीशे कोटींच्यावर खर्च होतो पण परिस्थिती मुंबईकरांना काय दिसते? अडीशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होऊन २ हजार किलोमीटरच्या नाल्यांची सफाई समाधानकारक नसते, असाही आरोप शेलार यांनी यावेळी केला. ज्या पद्धतीचा कामाचा वेग आहे तो पाहता पावसाळापूर्वी संपूर्ण नालेसफाई होईल हे अशक्यप्राय वाटत आहे. महापालिका आयुक्त आपण नाल्यावर या, नालेसफाईच्या कामाच्या भेटीचे चित्र दिसू द्या, अजूनही वेळ गेलेली नाही. नाल्यांची ७५ टक्के सफाई झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र चाळीस-पंचेचाळीस टक्क्यांच्यावर नालेसफाई झाल्याचे दिसत नाही, असाही आरोप शेलार यांनी केला आहे. महापालिकेने २ लाख ७३ हजार मॅट्रिक टन गाळ काढल्याचे म्हटले आहे. हा गाळ कुठे टाकला, व्हिडिओ दाखवा? क्षेपणभूमी कुठे आहे? सर्टिफिकेट दाखवा, जिथून गाळ काढला त्या भागातल्या आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेतली का? कंत्राटदारांनी दिलेला आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडला, अशीही टीका त्यांनी केली. गेल्या २५ वर्षात उद्धवजींनी काम नीट केले असते तर ही परिस्थिती आली नसती. उद्धवजींच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नाल्याचे गाळ मोजण्याचे परिमाण होते ते अजब होते. नाला शंभर टक्के साफ करायचा नाही हा नियम उद्धव ठाकरे यांच्या काळात होता. नाल्यातील गाळ मोजण्याची प्रक्रिया किती, त्याचे परिमाण उद्धवजींच्या काळात वेगळे होते. त्यामुळे नाल्यातील गाळ काढण्याचे नवीन मापदंड ठरवण्याची आवश्यकता आहे. नालेसफाईचा परिमाण ठरवणारा नवा मापदंड करावा अशीही मागणी शेलार यांनी केली आहे.

Previous Post

स्ट्राँगरूममध्ये ठाणे जिल्ह्यातील १३,२०८ यंत्रे

Next Post

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश; नालेसफाईची कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करावी, अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा

Next Post
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश; नालेसफाईची कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करावी, अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश; नालेसफाईची कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करावी, अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा

BreakingNews

ठाण्यात स्वातंत्र्यदिनी रंगणार श्वानांची अनोखी देशभक्ती; ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन!

गोष्टी आणि कलेच्या माध्यमातून घडणार विद्यार्थ्यांचे भविष्य; पालघर जिल्हा परिषदेचा ‘कहानी-कला-खुशी’ उपक्रम!

‘महाज्योती’ची यूपीएससीत दमदार कामगिरी; केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ११ विद्यार्थी असिस्टंट कमांडेंट

वर्तकनगरमध्ये महापालिकेचा बुलडोझर; हातगाड्या, पानटपऱ्या हटवून पदपथ केले चकाचक!

पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पान मसाल्यासाठी प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइल पॅकेजिंग बंद!

‘वॉक फॉर वॉटर’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन’च्या लोगोचे प्रकाशन!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.