Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

स्ट्राँगरूममध्ये ठाणे जिल्ह्यातील १३,२०८ यंत्रे

जिल्हाभरातील १८ विधानसभा मतदारसंघांतील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्रात मत बंदिस्त केले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 21, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
स्ट्राँगरूममध्ये ठाणे जिल्ह्यातील १३,२०८ यंत्रे
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे लाेकसभेच्या २४ उमेदवारांसह, कल्याणच्या २८ आणि भिवंडीच्या २७ उमेदवारांसाठी जिल्हाभरात साेमवारी मतदान झाले. जिल्हाभरातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांपैकी ५० ते ५५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाभरातील १८ विधानसभा मतदारसंघांतील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्रात मत बंदिस्त केले आहे. या सर्व ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदाेबस्तात ठिकठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आल्या. या मतदान यंत्रांना ३७ ट्रक, १९ टेम्पाे आणि ३१ कंटेनरद्वारे स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आले आहे. जमा झालेल्या ठिकाणीच ४ जून राेजी या यंत्रांमधील मतमाेजणी करण्यात येईल. या यंत्रणाची सुरक्षा शस्त्रधारी, सीआरपीएफ, आरपीएफच्या जवानांकडून तीन टप्प्यांत हाेणार आहे. ठाणे लाेकसभा मतदारसंघातील चार हजार ९०६ मतदान यंत्रांद्वारे मतदारांनी त्यांचे मत बंदिस्त केले. या यंत्रांना सात ट्रक, ११ टेम्पाे आणि १६ कंटेनर आणण्यासाठी वापरण्यात आले आहे. सर्व यंत्रणा दाेन हजार ४५३ मतदान केंद्रांवरून कडक सुरक्षेत कावेसर येथील न्यू हाेरायझन हायस्कूल, कासारवडवली, घाेडबंदर राेड येथे जमा करण्यात आली आहेत. या हायस्कूलमध्ये मतमाेजणी करण्यात येणार आहे.

कल्याण लाेकसभेच्या एक हजार ९६० मतदान केंद्रांवरील तीन हजार ९२० मतदान यंत्रे डाेंबिवली पूर्वच्या सावित्रीबाई फुले कलामंदिर, नाट्यगृहाच्या तळमजल्यात कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहेत. या यंत्रांना दहा ट्रक, सहा टेम्पाे आणि सात कंटेनरद्वारे स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आले. या यंत्रातील मतमाेजणी डाेंबिवली पूर्वच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील दिवंगत सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार पडणार आहे. भिवंडी लाेकसभेच्या दाेन हजार १९१ मतदान केंद्रांवरील चार हजार ३८२ मतदान यंत्रांना सावद गाव येथील केयूडी बिझनेस क्लस्टर येथे २० ट्रक, दाेन टेम्पाे आणि आठ कंटेनरद्वारे आणण्यात आले आहे. येथेच मतमाेजणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Previous Post

भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Next Post

आशिष शेलार यांची मागणी; नालेसफाईच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढा, महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे

Next Post
बांधकामे रोखण्याचा आयुक्तांचा इशारा, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना; बांधकामांबाबत पालिकेच्या सूचना

आशिष शेलार यांची मागणी; नालेसफाईच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढा, महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.