Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आय.पी.एस अधिकारी आहेत ते लवकरच पदभार स्वीकारतील

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 5, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवल्यानंतर संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने रश्मी शुक्ला यांची बदली करावी यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्यानंतर काल (दि.4) शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. शुक्ला यांच्या बदलीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता.

रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर निवडणूक आयोगाने नव्या पोलीस महासंचालक पदासाठी आज (दि.5) दुपारी एक वाजेपर्यंत नावे सुचवण्यास सांगितले होते. त्यानंतर या पदासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार हे तीन नावे सुचवण्यात आली होती. त्यानंतर आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवल्यानंतर संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आय.पी.एस अधिकारी आहेत. सध्या वर्मा डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत आहे. वर्मा यांचे नाव नवे पोलीस महासंचालक म्हणून कालपासून चर्चेत होते. निवडणूक आयोगाने संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केल्यानंतर ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.

रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे त्या वारंवार वादात अडकल्या होत्या. याआधी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. एवढेच नव्हे तर, अजूनही आमचे फोन टॅप होत आहे, अशी तक्रार काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले होते.

Previous Post

साताराजिल्ह्यात भाजपला खासदारकीच्या नात्याने जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी उदयनराजे यांची धडपड सुरु

Next Post

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत ठाकरे गटाच्या पाच बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

Next Post
राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत ठाकरे गटाच्या पाच बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत ठाकरे गटाच्या पाच बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.