Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत ठाकरे गटाच्या पाच बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 5, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत ठाकरे गटाच्या पाच बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटातील ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात भिवंडी येथील माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा समावेश आहे.

भिवंडी पूर्व मतदारसंघ महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाला सोडण्यात आला. त्यात तिथले माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष निवडणुकीत अर्ज दाखल केला. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी अर्ज मागे घेतला. तरीही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे रुपेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर, जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल, झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी- मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे, वणी तालुकाप्रमुख यांचीही पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. रुपेश म्हात्रे म्हणाले होते की, पक्षात फूट झाली त्यानंतर आम्ही पक्षाची एकजूट करण्यासाठी मी सर्व काही केले आहे. लोकसभेत आम्ही ताकद वाढवली. आमच्या पक्षाने ठरवला तो खासदार आम्ही निवडून दिला, लोकसभेत आमच्यावर अन्याय झाला. आता विधानसभेत जागावाटपाटतही आमच्यावर अन्याय झाला. २०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाला निवडून यावं म्हणून कपिल पाटील यांचं काम आम्हा सर्वांना करावं लागलं. आता देखील तीच परिस्थिती आहे. वांद्रे आणि वरळीमध्ये मदत व्हावी म्हणून या ठिकाणी मुस्लिम उमेदवारी किंवा समाजवादीचा उमेदवार देण्यात यावा, अशापद्धतीने कुठेतरी त्यांच्या राजकारणासाठी आमचा प्रत्येकवेळी बळी देण्याचं काम होत आहे. भिवंडीवर नेहमी अन्याय केला जात आहे. हेच यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केले आहे, आता उद्धव ठाकरेही करत आहेत असा आरोप त्यांनी केला होता.

 

Previous Post

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

Next Post

‘’हितसंबंधी गट व दबाव गटाकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे न्यायालयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न’’ – सीजेआय चंद्रचूड

Next Post
‘’हितसंबंधी गट व दबाव गटाकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे न्यायालयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न’’ – सीजेआय चंद्रचूड

‘’हितसंबंधी गट व दबाव गटाकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे न्यायालयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न’’ - सीजेआय चंद्रचूड

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.