Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रातून अमित शाह उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लाओस दौऱ्यावर असल्याने उपस्थित राहू शकणार नाहीत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 10, 2024
in ताज्या बातम्या, नवी दिल्ली, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच  केंद्रातून अमित शाह उपस्थित राहणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : जगविख्यात उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दुपारी वरळीतील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांचे पार्थिव सामान्य नागरिकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी एनसीपीएमध्ये आणण्यात आले आहे. रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रातून गृहमंत्री अमित शाह हे येणार असल्याचे वृत्त येत आहे. भारत सरकारकडून शाह हे रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करतील असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लाओस दौऱ्यावर निघाले आहेत. यामुळे ते उपस्थित राहू शकणार नाहीत. मोदी यांनी रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा यांचे फोनवरून सांत्वन केले आहे. रतन टाटा यांचे पार्थिव नरीमन ग्राऊंडच्या एनसीपीए ग्राऊंडवर आणण्यात आले आहे. टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी टाटा यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

भारताचे ज्येष्ठ उद्योगपती टाटा समुहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे निधन झाल्याची रात्री बातमी आली. ही बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. टाटा यांच्या निधनाची बातमी रात्री उशीरा आली. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा जीवनप्रवास वयाच्या ८६व्या वर्षी थांबला. सर्वसामान्य कुटुंबीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करून नॅनोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या जाण्याने उद्योगविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

“माणसातला देव देवाला भेटणार..!” रतन टाटांच्या निधनानंतर उत्कर्ष शिंदेची भावुक करणारी पोस्ट

Next Post

सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली

Next Post
सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली

सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.