Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली

शिवकुमार याने कुर्ला परिसरात दलालासोबत फिरुन घरमालकाला दुप्पट भाडे दिले होते

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 15, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी शनिवारी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या  गुंडांनी हत्या केली होती. सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांबद्दलची माहिती समोर येत आहे. सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांनी मुंबई उपनगरात असणाऱ्या कुर्ला येथे पटेल चाळीत एक खोली भाड्याने घेतली होती. तिन्ही मारेकरी याच ठिकाणी राहत होते.

शिवकुमार,धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह  हे तिघेही 2 सप्टेंबरपासून पटेल चाळीत भाड्याने राहायला आले होते. येथील 225 क्रमांकाच्या खोलीत हे तिघे राहत होते. या तिघांनी या खोलीसाठी तब्बल 14 हजार रुपये भाडे मोजले होते. येथील प्रचलित भाड्यापेक्षा ही रक्कम जास्त होती. मात्र, या तिघांनी एका एजंटमार्फत घरमालकाला दुप्पट भाडे दिले होते. हे तिघेही आजुबाजूच्या रहिवाशांसोबत आदराने वागायचे, अशी माहिती येथील एका रहिवाशाने दिली.

मारेकऱ्यांपैकी एक असणारा गुरमेल अनेकदा चाळीच्या परिसरात सिगरेट पीत मोबाईलवर बोलत फिरायचा. तो लहान मुलांशी इंग्रजीत बोलायचा. तो बऱ्याचदा शेजाऱ्यांकडे असलेल्या पाळीव कुत्र्याशी खेळायचा. या तिघांची आर्थिक परिस्थिती चांगली वाटत असल्याने चाळीतील रहिवाशांना हे तिघे गुन्हेगार असतील, याचा थोडाही संशय आला नाही. मात्र, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर या तिघांचे चेहरे टेलिव्हिनजच्या स्क्रीनवर झळकायला लागले तेव्हा पटेल चाळीतील लोकांना धक्का बसला.

या घटनेनंतर पटेल चाळीतील मारेकरी राहत असलेल्या खोलीला टाळे ठोकले आहे. नागरिकांना खिडकीतून घरात अस्ताव्यस्त पडलेले सामान दिसत आहे. गाद्या, कपडे,चपला, पाणी आणि शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्या खोलीत पडून आहेत. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणात धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह, प्रवीण लोणकर या तिघांना अटक केली आहे. तर शिवकुमार अद्याप फरार आहे. तो राज्याबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

शिवकुमार याने कुर्ला परिसरात दलालासोबत फिरुन घर भाड्याने घेतले होते. सगळ्यात प्रथम तो पटेल चाळीत राहायला आला. त्यानंतर धर्मराज कश्यप आणि शेवटी गुरमेल सिंह पटेल चाळीत राहायला आला. गुरुमेल आणि शिवकुमार यांच्याकडे गोळीबार करण्याची जबाबदारी होती. तर धर्मराज कश्यप याच्याकडे गोळीबारानंतर खाज येणारा स्प्रे मारण्याची जबाबदारी होती.

बाबा सिद्दीकी हे झिशान यांच्या कार्यालयातून बाहेर पडताच शिवकुमारने अंदाधुंद गोळीबार केला होता. यापैकी तीन गोळ्या सिद्दीकी यांना लागल्या होत्या. साधारण सात फुट अंतरावरुन शिवकुमारने सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर धर्मराजने मिरची स्प्रे मारला होता. या आरोपींना फक्त बाबा सिद्दीकी यांना मारायचे आहे, इतकीच माहिती देण्यात आली होती. मात्र, या सगळ्यामागे कोण आहे, याबद्दल आरोपींना कोणतीही माहिती नसल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांना मारण्यासाठी आरोपींना कोणतीही रक्कम ठरवून देण्यात आली नव्हती. ‘काम होने दो, बडी अमाउंट मिलेगी’, एवढचे आरोपींना सांगून त्यांना बाबा सिद्दीकी यांचा फोटो आणि फ्लेक्स देण्यात आला होता.

Previous Post

रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रातून अमित शाह उपस्थित राहणार

Next Post

शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.