Lokrakshanay
Saturday, April 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

नागरिक-प्राणीमित्र वाद टाळण्यासाठी महापालिकेचा पुढाकार; नसबंदी व लसीकरणावरही भर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 25, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!
Share on FacebookShare on Whatsapp

वसई-विरार : वसई विरार महापालिकेकडून शहरातील भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, विविध भागांत ४४ अधिकृत ‘डॉग फीडिंग स्पॉट’ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सार्वजनिक ठिकाणी होणारा श्वानांचा त्रास कमी करणे आणि श्वानप्रेमी व इतर नागरिकांमध्ये उद्भवणारे वाद टाळणे हा आहे. या ठिकाणी नियोजित पद्धतीने अन्न देण्याची व्यवस्था केली जाईल, ज्यामुळे श्वानांचे अनियंत्रित फिरणे कमी होण्यास मदत होईल. पालिकेकडून प्रथम या संभाव्य ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून, त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल.

जागा निश्चित झाल्यानंतर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात येणार असून, ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयात महापौर अजिव पाटील यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्राणीमित्र संस्था, सोसायटी प्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग घेऊन अंतिम कृती आराखडा निश्चित केला जाईल. याशिवाय, भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नसबंदी (ABC) मोहिमेला गती देणे, लसीकरण वाढवणे आणि तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पडेस्क सुरू करण्यावरही भर दिला जाणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा, रुग्णालये आणि रेल्वे स्थानकांसारख्या संवेदनशील ठिकाणांहून श्वानांना हलवून निवारा केंद्रात ठेवण्याचे नियोजन सुरू असले, तरी सध्या योग्य जागेच्या अभावामुळे अंमलबजावणीत अडचणी येत असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Next Post

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

Next Post
भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.