Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

१२ वर्षानंतर फरार आरोपीला अटक

संचित रजा घेऊन फरार झालेल्या मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्याला मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने मीरा रोड येथून अटक केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 13, 2023
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
१२ वर्षानंतर फरार आरोपीला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

वसई : संचित रजा घेऊन फरार झालेल्या मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्याला मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने मीरा रोड येथून अटक केली आहे. तो तब्बल १२ वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. २००७ मध्ये मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी शाखेने (नार्कोटीक्स कंट्रोस ब्युरो) नासिरअली खान (५२) या अमली पदार्थ विक्रेत्याला अटक केली होती. तो मुंबईच्या भायखळा येथे रहात होता. त्याच्यावर अमली पदार्था बाळगल्याप्रकरणी खटला सुरू होता. २०१० मध्ये त्याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर १० वर्षांची शिक्षा सुनवाण्यात आली आणि त्याची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान ११ फेब्रुवारी २०११ मध्ये त्याने संचित रजेसाठी (पॅरोल) अर्ज केला होता. त्याला ३० दिवसांची संचित रजा मंजूर झाली. मात्र तेव्हापासून तो फरार होता.

त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला होता. परंतु तो आढळून आला नव्हत. दरम्यान मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र वितारे यांना हा आरोपी मीरा रोड येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तपास करून सापळा लावला आणि मीरा रोडच्या शीतल नगर येथून त्याला अटक केली. संचित रजेवरून फरार झाल्यानंतर त्याने आपली ओळख लपवली होती आणि पुन्हा अमली पदार्थाच्या व्यवहारात सक्रीय झाला होता. दरम्यान, त्याने दुसरे लग्नही केले होते. पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुला राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंद्रे, सरक, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

ईडीकडून कंपनीच्या अध्यक्षाला १४९ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक

Next Post

दहशत निर्माण करून नागरिकाला डोंबिवलीत फडके रोडवर लुटणारे दोन जण अटकेत

Next Post
दहशत निर्माण करून नागरिकाला डोंबिवलीत फडके रोडवर लुटणारे दोन जण अटकेत

दहशत निर्माण करून नागरिकाला डोंबिवलीत फडके रोडवर लुटणारे दोन जण अटकेत

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.