Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

साडेपाच लाखांची ब्राऊन शुगर जप्तकरत एका महिलेला अटक; कल्याणमध्ये विद्यार्थी-तरुण ड्रग्जच्या विळख्यात

ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या महिलेल्या कल्याणच्या टिळक नगर पोलिसांनी अटक केली. या महिलेकडून पोलिसांनी साडेपाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. पोलिसांकडून या महिलेची चौकशी सुरू आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 10, 2024
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या
साडेपाच लाखांची ब्राऊन शुगर जप्तकरत एका महिलेला अटक; कल्याणमध्ये विद्यार्थी-तरुण ड्रग्जच्या विळख्यात
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याणचा ‘उडता पंजाब’ होत चालल्याचे चित्र दिसत आहे. कल्याणमधील विद्यार्थी आणि तरुण ड्रग्जच्या विळख्यामध्ये अडकले आहेत. कल्याण पोलिसांनी धडक करावाई करत ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली. ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या महिलेल्या कल्याणच्या टिळक नगर पोलिसांनी अटक केली. या महिलेकडून पोलिसांनी साडेपाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. पोलिसांकडून या महिलेची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व परिसरातील कचोरे हनुमान नगर परिसरातून टिळक नगर पोलिसांनी ड्रग्स माफिया वृद्ध महिलेला सापळा रचून अटक केली. सलमाबेगम नूर मोहम्मद शेख असे या महिलेचे नाव आहे . या महिलेला २०१५ मध्ये देखील ड्रग्स विक्री प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. सलबेगमवर टिळक नगर पोलिस महिनाभर लक्ष ठेवून होते. तिची संपूर्ण माहिती मिळात याच परिसरात सापळा रचत पोलिसांनी तिला अटक केली. या महिलेकडून १०४ ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त केली. सलमाबेगम ड्रग्स कुठून आणत होती कुणाला विक्री करत होती याचा तपास टिळक नगर पोलिस करत आहेत .

हनुमाननगर परिसरात राहणारी ६५ वर्षीय महिला ड्रग्जची विक्री करत असल्याची टिळक नगर पोलिसांना माहिती मिळाली होती. विद्यार्थी आणि तरुणांना ही महिला ट्रक्स विक्री करत होती. २०१५ मध्ये या महिलेला टिळक नगर पोलिसांनी ट्रक विक्री प्रकरणीच अटक केली होती. जेलमधून सुटल्यानंतर तिने पुन्हा ड्रग्ज विक्रीला सुरूवात केली. डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांना ही माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांचे एक पथक तयार केले. पोलिसांनी सापळा रचून या महिलेला रंगेहात अटक केली. या महिलेविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिस त्या परिसरातील एका शाळेच्या छतावर जाऊन पाळत करत होते. या महिलेच्या हालचालीवर पोलिसांचे लक्ष होते. तिला कोण-कोण भेटते याची माहिती पोलिसांनी गोळा केली. त्यानंतर तिला रंगे हाथ पकडले. या महिलेकडून १०४ मार्फीन ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याची बाजारातील किंमत साडेपाच लाख रुपये आहे. या महिलेला ड्रग्जचा पुरवठा कोण करायचा?, यामध्ये एखाद्या टोळीचा समावेश तर नाही ना?, कोणत्या शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ती ड्रग्ज देत होती या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.

Previous Post

बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर, अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच; गर्दीचा मुंबईकरांना फटका

Next Post

वकील उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट; मंदिराबाहेर मिळणारे लाल धागे ठरतात दहशतवाद्यांचे कवच

Next Post
वकील उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट; मंदिराबाहेर मिळणारे लाल धागे ठरतात दहशतवाद्यांचे कवच

वकील उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट; मंदिराबाहेर मिळणारे लाल धागे ठरतात दहशतवाद्यांचे कवच

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.