सिंधुदुर्ग : मालवण समुद्रात प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असतात. उलटी सदृश पदार्थांला भरमसाठ दर मिळून कोट्यवधींची कमाई केली जाते. सोने आणि हिऱ्यापेक्षा जास्त मौल्यवान असते. देवमाशाची उलटी म्हणून त्यांचा आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असले म्हणून त्याची तस्करी केली जाते. त्याची किंमत सोने आणि हिऱ्यापेक्षीही जास्त आहे. देवमाशांच्या उलटीची तस्करी भारतात होत नाही. वन कायद्याअंतर्गत त्याला बंदी आहे. ४० किलो वजनाची उलटी सदृश पदार्थ आढळल्याने दांडी समुद्र किनारी मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळाली. अनेक मच्छिमारानी दांडी समुद्राकडे धाव घेतली. सिंधुदुर्गातल्या मालवण दांडी येथील मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना आऊट बोल गिलनेट नौकेला ४० किलो वजनाचा उलटीसदृश पदार्थ आढळून आला. दांडी येथील योगेंद्र खराडे हे समुद्रात मासेमारी करत होते. मासेमारी करून झाल्यानंतर किनाऱ्याकडे येत असतानाच उलटी सदृश पदार्थ दिसून आला. उलटी सदृश पदार्थ हा देवमाशांचा असल्याचं खराडे यांच्या लक्षात आलं. त्यांनी तो उलटी सदृश पदार्थ किनाऱ्याकडे घेऊन आले. त्यानंतर त्यांनी वनविभागाला कळविण्यात आले.
वनाधिकारी तातडीने दांडी इथे दाखल झाले. मेनासारखे असलेले गठ्ठे दोन पिशवीत भरण्यात आले. सुमारे त्याचे वजन ४० किलो एवढे झाले. आंतरराष्ट्रीय बाजार भावापेक्षा किंमत ४० कोटी होऊ शकते. भारतात त्याला वन कायद्याअंतर्गत खरेदी विक्रीस बंदी आहे. या उलटी सदृश पदार्थांला सुगधं येत नव्हता. पॉवम्स व्हेल प्रजातींच्या देवमाशाच्या उलटीला अंबर ग्रीस म्हटलं जातं. सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी अंबर ग्रीसचा वापर केला जातो. अंबर ग्रीसपासून बनवलेली द्रव्य दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे.
गेले २ वर्षांपासून अंबर ग्रीसची अनेक प्रकरणे उघडीस आली आहे. अनेक ठिकाणी तस्करी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अंबर क्रिश या उलटी सदृश्य पदार्थाला समुद्रात सापडल्यामुळे त्याला एक प्रकारचं मौल्यवान असं म्हटलं जातं. अंबर क्रिश उलटी सदृश्य पदार्थाला सोन्यापेक्षाही जास्त भाव मिळतो. म्हणून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी मागणी असते. भारतात त्याची खरेदी विक्री होत नाही. मात्र, दांडी समुद्रामध्ये सापडलेलं उलटी सदृश्य अंबर ग्रीस पदार्थ वाहून आलेलं प्रामाणिकपणे योगेंद्र खराडे या मच्छीमाराने वनविभागाच्या ताब्यामध्ये सुपूर्त केला आहे. त्यामुळे या मच्छीमाराचं जिल्हाभर कौतुक केलं जात आहे.