Lokrakshanay
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वालावलकर रुग्णालयात २० दिवस बेशुद्ध असलेल्या चिमुकल्याला मिळाले जीवदान !

या बद्दल डेरवण रुग्णालय प्रशासनाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 3, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, रत्नागिरी
वालावलकर रुग्णालयात २० दिवस बेशुद्ध असलेल्या चिमुकल्याला मिळाले जीवदान !
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी  : घणसोली, नवी मुंबई येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले होते. मात्र, ७ सप्टेंबर २०२४ ला मुलाच्या गळ्याला मण्यार या अत्यंत विषारी सापाने चावा घेतला. त्यामुळे ते बाळ पूर्णपणे बेशुद्ध झाले. श्वासही थांबला, आणि त्याच्या हातपायामधील ताकद पूर्णपणे गेली. बाळाला तातडीने भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात आणण्यात आले. अश्या बेशुद्ध अवस्थेत वालावलकर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. कृत्रिम श्वास देण्याकरता व्हेंटिलेटर लावण्यात आला.
पनवेलहून खास मार्गदर्शन करणारे डॉ. महेश मोहिते आणि वालावलकर रुग्णालयाचे डॉ.अनिल कुरणे, डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. अनेक दिवस बाळ निपचित होते. शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. जिवंतपणाचे लक्षण म्हणजे डोळ्याच्या बाहुल्याची हालचाल ती सुद्धा होत नव्हती. असे अनेक दिवसांपासून मुलाची प्रकृती गंभीर होत होती. भारत सीरमच्या अँटी स्नेक व्हेनमच्या एकूण ३० कुप्या देण्यात आल्या होत्या. तरीही सुधारणा दिसेना. शेवटी डॉक्टर्स नि सुद्धा आशा सोडली. पण ‘देव तारी त्याला कोण मारी’ म्हणून दहाव्या दिवशी बाळाने डोळे उघडले. हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत हात हलवू लागले आणि आपल्या आईला सुद्धा ओळखू लागले. जवळजवळ पाऊण महिना हे बाळ मृत्यू शय्येवर होते. पण बाळाला व्हेंटिलेटर असताना इन्फेक्शन होऊ नये, पाठीला जखमा होऊ नयेत याची पूर्ण जबाबदारी बालरोग तज्ज्ञांनी समर्थपणे पेलली‌. बाळाचा संपूर्ण खर्च हा महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आला. त्यांच्या आई वडिलांनी रुग्णालयाचे शतशः आभार मानले आहेत.
रुग्णालयातील बालरोल विभागातील नर्सिंग स्टाफ आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरी परब, डॉ. प्रचेता गुप्ता, डॉ. मोहित कडू, डॉ. सलोनी शाह, डॉ. पंक्ती मेहता, डॉ. तनीषा सोमकुवर यांनी विशेष सेवा देऊन बाळाचा जीव जीव वाचवला. या बद्दल डेरवण रुग्णालय प्रशासनाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

Previous Post

‘विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी केलेली जनजागृती परिणामकारक ठरते’ -ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे

Next Post

मराठीला ‘अभिजात भाषेचा दर्जा’; शरद पवारांकडून केंद्राचे केले अभिनंदन ! म्हणाले…

Next Post
मराठीला ‘अभिजात भाषेचा दर्जा’; शरद पवारांकडून केंद्राचे केले अभिनंदन ! म्हणाले…

मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांकडून केंद्राचे केले अभिनंदन ! म्हणाले...

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.