Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

विजेचा धक्का लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू

या धक्क्याने रोशन घरावरून जमिनीवर फेकला. जमिनीवर जोराने आदळल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 29, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
विजेचा धक्का लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे घर गळतेय म्हणून एका महिलेने एका बिगारी कामगाराच्या शाळकरी मुलाला आपल्या घराच्या छतावर गळके छत दुरूस्तीसाठी चढविला. छत दुरुस्तीचे काम करताना विद्यार्थ्याला विजेचा जोरदार धक्का लागून तो जागीच मरण पावला. याप्रकरणी घर मालकीणीवर मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन रमेश जाधव (१८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रोशनचे काका सूर्यकांत जाधव यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कल्याण पूर्वेतील टाटा पॉवर , जय मल्हारनगर येथे हा प्रकार घडला आहे. आशा सुभाष जैयस्वाल असे घर मालकीणीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, टाटा पॉवर जय मल्हानगर येथे आशा जैयस्वाल यांचे चाळीचे बैठे घर आहे. हे घर पाऊस सुरू झाला की गळते. घरात पावसाचे पाणी गळू नये म्हणून आशा यांनी ताडपत्री टाकण्याचा निर्णय घेतला. हे काम करण्यासाठी रोशन जाधव याला सांगितले.

घराच्या छतावर पावसामुळे शेवाळ बाजल्याने निसरडे झाले आहे. रोशनला हातमोजे, हेल्मेट, रबरी बूट अशी जीव संरक्षणाची पुरेशी साधने देऊन मग घरावर चढविणे आवश्यक होते. अशी कोणतीही साधने न देता रोशनला आशा यांनी घराच्या छतावर चढविले. छत दुरुस्ती आणि त्यावर ताडपत्री टाकत असताना रोशनाला अचानक घरावरून गेलेल्या जिवंत वीज वाहिनीचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने रोशन घरावरून जमिनीवर फेकला. जमिनीवर जोराने आदळल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. आरोपी आशा जैयस्वाल यांच्या निष्काळजीपणाने हा प्रकार घडल्याने पोलिसांनी तिच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शाहू काळदाते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

कल्याण शिळफाटा रोड भागात खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू

Next Post

टिटवाळ्यात बेकायदा चाळींची उभारणी, भूमाफिया विरुध्द गुन्हा दाखल

Next Post
टिटवाळ्यात बेकायदा चाळींची उभारणी, भूमाफिया विरुध्द गुन्हा दाखल

टिटवाळ्यात बेकायदा चाळींची उभारणी, भूमाफिया विरुध्द गुन्हा दाखल

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.