Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सराफी व्यावसायिकावर ऐन दिवाळीच्या मुर्हतावर गोळ्या झाडून सोन्याची लूट

ऐन दिवाळीच्या मुर्हुतावरच वानवडी परिसरात एका सराफी व्यावसायिकावर गोळ्या झाडून सोने लुटून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 9, 2023
in ताज्या बातम्या, पुणे
सराफी व्यावसायिकावर ऐन दिवाळीच्या मुर्हतावर गोळ्या झाडून सोन्याची लूट
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ऐन दिवाळीच्या मुर्हुतावरच वानवडी परिसरात एका सराफी व्यावसायिकावर गोळ्या झाडून सोने लुटून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सराफावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून, त्यातील एक गोळी तोंडाला लागली असून दोन गोळ्या पायाला लागल्या आहेत. त्यात सराफ व्यावसायिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. सराफाकडील दोन तोळे सोने गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रतीक मदनलाल ओसवाल (वय ३५) असे जखमी झालेल्या सराफी व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप हे सराफी व्यावसायिक असून, त्यांचे सय्यदनगर परिसरात सोने-चांदी विक्रीचे दुकान असून ते वानवडी परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून दुकानातील सोने बॅगेत घेऊन दुचाकीवरून घराकडे निघाले होते. बी. टी. कवडे रस्त्यावर आल्यानंतर एका मॉलसमोर भर वर्दळीच्या ठिकाणीच दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या तोंडाला तर, दोन उजव्या पायातील मांडीला लागल्या आहेत. गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांची धावाधाव झाली. त्याचवेळी याची माहिती नियत्रंण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर वानवडी पोलिसांना घटनेबाबत सांगण्यात आले. गोळीबार झाल्याचे समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वानवडी पोलिसांनी येथे धाव घेतली. दरम्यान, हल्लेखोर पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

बांगलादेशी महिलेचे सहार पोलिसांच्या ताब्यातून पलायन

Next Post

पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे

Next Post
पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे

पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.