Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 9, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटी ७३ लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. खरीप हंगामात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या, त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण १७०० कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

अग्रीमबाबत समस्या तातडीने सोडविण्यासंदर्भात मंत्री श्री.मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्याबाबत आग्रही होते. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना मंत्री श्री.मुंडे यांनी केल्या आहेत.

जिल्ह्यासाठी पीकविमा मंजूर रक्कम अशी (रक्कम रुपयांत)

नाशिक – शेतकरी लाभार्थी – ३ लाख ५० हजार (रक्कम – १५५.७४ कोटी)

जळगाव – १६,९२१ (रक्कम – ४ कोटी ८८ लाख)

अहमदनगर – २,३१,८३१ (रक्कम – १६० कोटी २८ लाख)

सोलापूर – १,८२,५३४ (रक्कम – १११ कोटी ४१ लाख)

सातारा – ४०,४०६ (रक्कम – ६ कोटी ७४ लाख)

सांगली – ९८,३७२ (रक्कम – २२ कोटी ४ लाख)

बीड – ७,७०,५७४ (रक्कम – २४१ कोटी २१ लाख)

बुलडाणा – ३६,३५८ (रक्कम – १८ कोटी ३९ लाख)

धाराशिव – ४,९८,७२० (रक्कम – २१८ कोटी ८५ लाख)

अकोला – १,77,२५३ (रक्कम – ९७ कोटी २९ लाख)

कोल्हापूर – २२८ (रक्कम – १३ लाख)

जालना – ३,७०,६२५ (रक्कम – १६० कोटी ४८ लाख)

परभणी – ४,४१,९७० (रक्कम – २०६ कोटी ११ लाख)

नागपूर – ६३,४२२ (रक्कम – ५२ कोटी २१ लाख)

लातूर – २,१९,५३५ (रक्कम – २४४ कोटी ८७ लाख)

अमरावती – १०,२६५ (रक्कम – ८ लाख)

एकूण – लाभार्थी शेतकरी संख्या – ३५,०८,३०३ (मंजूर रक्कम –  १७०० कोटी ७३ लाख)

Previous Post

सराफी व्यावसायिकावर ऐन दिवाळीच्या मुर्हतावर गोळ्या झाडून सोन्याची लूट

Next Post

डॉ. संजीव ठाकूर ससूनचे अधिष्ठाता यांची नियुक्ती रद्द

Next Post
डॉ. संजीव ठाकूर ससूनचे अधिष्ठाता यांची नियुक्ती रद्द

डॉ. संजीव ठाकूर ससूनचे अधिष्ठाता यांची नियुक्ती रद्द

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.