Lokrakshanay
Tuesday, June 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक

जयपूर-मुंबई विमान प्रवासादरम्यान विमानात धुम्रपान करताना प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 27, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : जयपूर-मुंबई विमान प्रवासादरम्यान विमानात धुम्रपान करताना प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अर्जुन राम ठालोर (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो राजस्थान येथील रहिवासी आहे. आरोपीविरोधात विमान अधिनियम १९३७ अंतर्गत सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार ओम रमेश देशमुख घाटकोपर येथील असल्फा परिसरात राहतात. ते गेल्या पाच वर्षांपासून एका विमान कंपनीत सहयोगी सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. जयपूर विमानतळावरुन मुंबईला जाणार्‍या एका विमानाने उड्डाण केले होते. त्यात अर्जुन ठालोर हा प्रवासी होता. विमानात सर्व प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी धुम्रपान मनाईबाबतचे चिन्ह लावण्यात आले होते. तसेच जयपूरहून विमान उड्डाण करण्यापूर्वी वरिष्ठ कर्मचारी काजोल घाग यांनी विमानात धुम्रपान करण्यास मनाई असल्याची घोषणा केली होती. तरीही सव्वासात वाजता अर्जुन हा शौचालयात गेला आणि त्याने धुम्रपान केले. हा प्रकार तेथे कामाला असलेल्या एका महिलेच्या निदर्शनास येताच तिने तिच्या वरिष्ठांना ही माहिती दिली.

मुंबई विमानतळावर विमान उतरताच त्याला विमानतळावरील सुरक्षारक्षकाच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यानंतर त्याला सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणी भादवीसह विमान अधिनियमन १९३७ अंतर्गत गुन्हा दाखल होताच अर्जुन ठालोरला पोलिसांनी अटक केली.

Previous Post

मोबाइल चोरीसाठी तरूणावर हल्ला; मध्य रेल्वेत फटका गँग पुन्हा सक्रीय, धावत्या लोकलमधून पडून प्रवाशाने गमावले दोन्ही पाय

Next Post

बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद

Next Post
पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी; पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’

बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा नफा शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबईत मराठी नामफलक मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१२४ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई!

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.