Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मोबाइल चोरीसाठी तरूणावर हल्ला; मध्य रेल्वेत फटका गँग पुन्हा सक्रीय, धावत्या लोकलमधून पडून प्रवाशाने गमावले दोन्ही पाय

रेल्वेतून पडल्याने तरूणाने दोन्ही पाय गमावल्याची घटना ठाण्यात घडली आहे. या तरूणावर सध्या उपचार सुरू आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 25, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
मोबाइल चोरीसाठी तरूणावर हल्ला; मध्य रेल्वेत फटका गँग पुन्हा सक्रीय, धावत्या लोकलमधून पडून प्रवाशाने गमावले दोन्ही पाय
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : अलीकडे लोकलमधून प्रवास करताना होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. सध्या तशीच एक घटना पुन्हा ठाण्यातून समोर आली आहे. मोबाइल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने केलेल्या हल्ल्यात एका युवकाला आपले पाय गमवावे लागले आहे. जगन लक्ष्मण जंगले असं या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, जगन लक्ष्मण जंगले हे दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल याठिकाणी काम करतात. नेहमीप्रमाणे जगन यांनी २२ मे रोजी कल्याणला जाण्यासाठी लोकल रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानकातून पकडली होती. ठाणे स्थानक सोडल्यानंतर जगन दरवाजात उभे होते. तेव्हा यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याच्या हेतुने एका गर्दुल्याने त्यांच्यावर हल्ला केला. जगनच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्यानं फटका मारला. त्यामुळे तोल जावून जगन फलाट क्रमांक दोनपासून २०० मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्यावेळी त्यांच्या हातातील मोबाइल देखील गहाळ झाला. या घटनेत जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचं चाक गेलं. त्यामुळ जगन या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीने तातडीने उचललं. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जगन यांना दाखल करण्यात आलं होतं.

परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे तसंच त्यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यामुळे त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याठिकाणी त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले. जगन हे घरातील एकमेव आर्थिक आधार आहेत. त्यांच्या घरातील परिस्थिती बिकट असून नुकतंच एका महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु या घटनेत त्यांनी दोन्ही पाय गमावले आहेत. असे प्रकार नेहमीच घडत असतात. रेल्वे पोलीस केवळ तपास करत आहोत, अशी माहिती देतात. जर अश्या प्रकारे रेल्वे प्रवाश्यांच्या जिवाशी खेळ होणार असेल, तर यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं नागरिक म्हणत (Local Accident) आहेत. आता याप्रकरणी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु पोलिसांनी याप्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. सध्या त्यांच्यावर ठाण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Previous Post

२७, २८ मे रोजी पश्चिम उपनगरांतील काही भागात पाणीपुरवठा बंद

Next Post

विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक

Next Post
विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक

विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.