वसई : नालासोपारा पोलिसांनी ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगरच्या जगन्नाथ अपार्टमेंट या इमारतीमध्ये एक नायजेरियन अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या घरात छापा टाकून इझे आना (४४) या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे तब्बल ५७ लाकांचे कोकेन आणि मेफोड्रोन हे अमली पदार्थ आढळून आले. तुळींज पोलिसांनी आरोपीला एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.