Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पावसाळ्यासाठी मुंबई मेट्रो सज्ज; २,४९६ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३० पंप कार्यान्वित!

चार मेट्रो मार्गिकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 10, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
पावसाळ्यासाठी मुंबई मेट्रो सज्ज; २,४९६ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३० पंप कार्यान्वित!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पावसाळ्यात प्रवाशांचा मेट्रो प्रवास सुरक्षित, अखंडित आणि सुकर व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विशेष पावसाळी सज्जता कृती आराखडा कार्यान्वित केला आहे. या आराखड्याअंतर्गत चार मेट्रो मार्गिकांवर एकूण २,४९६ सीसीटीव्ही कॅमेरे, ३० पाणी उपसा पंप, १,०७० इन्सुलेटरची तपासणी, २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पँटोग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या ‘दहिसर-गुंदवली मेट्रो ७’, ‘दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’, ‘दहिसर-काशीगाव मेट्रो ९’ आणि ‘मंडाले, मानखुर्द-डायमंड गार्डन मेट्रो २ ब’ या मार्गिकांचे संचालन एमएमआरडीएमार्फत केले जात आहे. यापैकी मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि मेट्रो ९ या मार्गिकांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पावसाळ्यातही सेवा सुरळीत ठेवण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मेट्रो २ ब आणि मेट्रो ९ मार्गिकांचा हा पहिलाच पावसाळा असल्याने अतिरिक्त दक्षता घेण्यात आली आहे.

पावसाळी सज्जता आराखड्यानुसार ३९ कार्यरत मेट्रो स्थानकांवर प्रत्येकी ६४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून चारही मार्गिकांवर विस्तृत देखरेख व्यवस्था उभारण्यात आली आहे. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील भागांमध्ये ३० पंप बसविण्यात आले असून स्थानके, डेपो आणि व्हायाडक्ट परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय मेट्रो नेटवर्कवरील १,०७० इन्सुलेटरची प्रतिबंधात्मक तपासणी व देखभाल करण्यात आली असून २५ केव्ही केबल्स, पँटोग्राफ, करंट ट्रान्सफॉर्मर्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि लाइटनिंग अरेस्टर्स यांचीही सखोल तपासणी करण्यात आली आहे. ट्रॅक्शन सब-स्टेशन्ससाठी पूर संरक्षण उपाययोजना अधिक मजबूत करण्यात आल्या असून आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा सुरू ठेवण्यासाठी काही मेट्रो गाड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रवाशांना कोणतीही अडचण आल्यास मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १८०० ८८९ ०५०५, १८०० ८८९ ०८०८ तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांक ८४५२९०५४३४ आणि ८६५२६३५३०१ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Previous Post

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नव्या मिश्र इंधनामुळे पेट्रोलपेक्षा २० रुपये स्वस्त पर्याय!

Next Post

होर्मुझ सामुद्रधुनीतील हेलिकॉप्टर घटनेनंतर अमेरिका-इराण तणाव शिगेला!

Next Post
होर्मुझ सामुद्रधुनीतील हेलिकॉप्टर घटनेनंतर अमेरिका-इराण तणाव शिगेला!

होर्मुझ सामुद्रधुनीतील हेलिकॉप्टर घटनेनंतर अमेरिका-इराण तणाव शिगेला!

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.