Lokrakshanay
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

शिक्षण विभागाचे आदेश; राज्यभरातील शिक्षकांमध्ये संताप

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 24, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे शिक्षकांचे वेतन रखडत असल्याची समस्या कायम असतानाच आता आणखी एका नव्या कारणाची भर पडली आहे. बँकेचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन रोखण्यात येणार असल्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिल्याने राज्यभरातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या परीक्षेचा काळ सुरू असताना अनेक शिक्षकांना निवडणूक कामांसाठीही नेमणुका देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत ई-केवायसी प्रक्रियेची अट घालून वेतन रोखण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. वारंवार वेगवेगळ्या कारणांवरून वेतन अडवणे हे नियमबाह्य असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

दरम्यान, २२ एप्रिल २०२६ रोजी वित्त विभागाच्या अधिदान व लेखा कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार शालार्थ आणि सेवार्थ प्रणालीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सूचनांच्या अनुषंगाने शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी शाळांना आदेश देत, ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय पुढील महिन्याची वेतन देयके सादर करू नयेत, असे स्पष्ट केले आहे. तसेच, वेतन देयकासोबत ई-केवायसी अर्जाची मूळ प्रत जोडणेही आवश्यक करण्यात आले आहे. या अटींची पूर्तता न केल्यास एप्रिल २०२६ मधील वेतन मे महिन्यात वितरित केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांची धावपळ सुरू झाली असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी जोर धरत आहे.

Previous Post

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Next Post

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

Next Post
ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

BreakingNews

इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकला; भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला

पुणेकरांनो, सावधान! महापालिका पुढील ३ महिने करणार ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा?

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत! – बच्चू कडूंचे विधान

इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीला नवे बळ!

आता ठरावीक वजनाच्या पॅकिंगमध्येच मिळणार खाद्यतेल! – केंद्र सरकार

मुंबई मेट्रो १ ला १२ वर्षे पूर्ण; १२५ कोटी प्रवाशांचा टप्पा पार!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.