Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

आता प्रवास होणार सुखकर; रात्रीची विशेष फेरी आणि परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जाहीर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 17, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे शहरात कोकणातील मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास असूनही, राज्य परिवहन (एसटी) सेवेच्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः सण-उत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी, तसेच प्रवासीसंख्या कमी असल्याचे कारण देत काही गाड्या बंद केल्या जात असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला होता. अशाच प्रकारे ठाणे ते शिंदी ही महत्त्वाची एसटी सेवा काही काळापूर्वी बंद करण्यात आली होती, ज्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत होता. या परिस्थितीमुळे ठाणेकरांमध्ये नाराजी निर्माण झाली होती आणि ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती.

दरम्यान, कोकण फर्स्ट फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश मिळत ही एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी संतोष शांताराम निकम यांच्या नेतृत्वाखाली, माजी खासदार आनंद परांजपे आणि जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या सहकार्याने राज्य परिवहन महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे-शिंदी आणि शिंदी-ठाणे अशी दोन्ही बाजूंनी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. या मार्गावर पनवेल, पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड, वेरळ फाटा आदी महत्त्वाच्या स्थानकांवरून प्रवासाची सोय उपलब्ध झाली असून, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. खोपट डेपोवरून रात्री ९.३० वाजता बस सुटणार असून, शिंदीवरून दुपारी १ वाजता परतीचा प्रवास होणार आहे. तसेच या गाडीचे आरक्षण ऑनलाइन तसेच बसस्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

Next Post

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Next Post
नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.