Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

दुकान निवडीचे स्वातंत्र्य पालकांनाच; नियम मोडणाऱ्या शाळांवर होणार कठोर कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 17, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राज्यातील खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांकडून गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानांतून किंवा थेट शाळेतूनच खरेदी करण्यासाठी केली जाणारी सक्ती आता थांबवण्याचे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांवर होणारा आर्थिक व मानसिक ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, कोणतीही शाळा अशा प्रकारची बंधनकारक अट घालू शकत नाही. संबंधित प्रकरणांमध्ये तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून, दोषी आढळणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय पुन्हा अधोरेखित करण्यात आला आहे, जेणेकरून पालकांना कोणत्याही प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागू नये.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही २६ ऑगस्ट २०२४ रोजी अशा प्रकारच्या सक्तीवर बंदी घालण्यात आली होती, तसेच ११ जून २००४ च्या शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याशिवाय, शाळा व्यवस्थापन समित्यांनीही गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसंदर्भात सक्ती न करण्याचा ठराव मंजूर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांनी संबंधित मंडळांनी मंजूर केलेलीच पाठ्यपुस्तके वापरणे बंधनकारक असून, कोणत्याही खासगी प्रकाशनांची पुस्तके सक्तीने लादता येणार नाहीत. तक्रारींसाठी स्वतंत्र ई-मेल आयडी प्रसिद्ध करण्याचे आणि त्यावर देखरेख करण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता वाढून पालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप

Next Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

Next Post
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

BreakingNews

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.