Lokrakshanay
Thursday, May 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

उबर आणि मेट्रोची हातमिळवणी; Uber ॲपवरून एका क्लिकवर मिळणार तिकीट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 20, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
उबर आणि मेट्रोची हातमिळवणी; Uber ॲपवरून एका क्लिकवर मिळणार तिकीट
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. पेटीएमनंतर आता उबर ॲपवर सुद्धा मुंबई मेट्रोचं तिकिट उपलब्ध होणार आहे. यापूर्वी मेट्रो लाईन १ चं म्हणजे, घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरील तिकिट उपलब्ध झालं होतं. आता त्यानंतर मेट्रो लाईन २A आणि ७ या मेट्रो लाईनचंही तिकीट आता उबर ॲपवर उपलब्ध झाले आहे. उबरने ही सुविधा आता मुंबईतही सुरू केली आहे. यापूर्वी दिल्ली आणि चेन्नईमध्येही अशी सुविधा सुरू झाली होती.

यामुळे मुंबईतील प्रवाशांना आता उबर ॲप न सोडता मेट्रोचे तिकीट खरेदी करता येईल. तिकीट खरेदी करणे सोपे होईल आणि लांब रांगा टाळता येणार आहे. उबर, मुंबई मेट्रो वन आणि ONDC Network यांच्या भागीदारीमुळे हे शक्य झाले आहे. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट शेअर करत दिली आहे. Yatri, Ixigo, Navi, EMT, Tummoc, Tripozo, One Ticket, Autope, Magicpin, Chalo, RedBus, Highway Delite आणि Pelocal यांसारखे अनेक ॲपच्या माध्यमातून ONDC नेटवर्कच्या माध्यमातून मेट्रो तिकीट सेवा आधीपासूनच उपलब्ध आहे. याशिवाय, मुंबई वन ॲप, मुंबई वन कार्ड आणि व्हॉट्स ॲप आधारित तिकिट खरेदी करून तुम्ही मेट्रो सेवांचा लाभ घेऊ शकतात. ही नवीन सुविधा सुरुवातीला प्रमुख उपनगरीय मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो लाईन २A आणि ७ वर उपलब्ध होत आहे. त्यानंतर लवकरच २B आणि ९ सोबत इतर मार्गांवरही ही सुविधा विस्तारित केली जाईल. मेट्रो तिकिट, रेल्वे तिकिट आणि कॅब बुकिंग या ॲपच्या माध्यमातून तुम्ही असे वेगवेगळे तिकिट तुम्ही बुक करू शकतात. यामुळे प्रवाशांना एकच ॲपवर सर्व बुकिंग करणं शक्य आहे.

उबर ॲपवरून मेट्रो तिकीट कसे बुक करावे?

१. तुमचे Uber App उघडा.
२. होम स्क्रीनवरील ‘Metro Tickets’ किंवा ‘Services’ या पर्यायावर क्लिक करा.
३. तुमचा प्रवासाचा मार्ग (प्रारंभिक आणि अंतिम स्टेशन) निवडा.
४. प्रवाशांची संख्या निवडा आणि भाडे तपासा.
५. UPI द्वारे पेमेंट पूर्ण करा.
६. मिळालेला QR कोड मेट्रो स्टेशनवर एन्ट्री आणि एक्झिटसाठी वापरा.

Previous Post

प्रशिक्षणही आणि भत्ताही! ठाणेकरांसाठी नागरी संरक्षण विभागाचे ५ दिवसीय विनामूल्य प्रशिक्षण

Next Post

घरोघरी पोहोचलेला Doraemon पोरका! दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे ८९ व्या वर्षी निधन

Next Post
घरोघरी पोहोचलेला Doraemon पोरका! दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे ८९ व्या वर्षी निधन

घरोघरी पोहोचलेला Doraemon पोरका! दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे ८९ व्या वर्षी निधन

BreakingNews

मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अण्णासाहेब पाटील महामंडळाला आणखी १५० कोटींचा निधी

बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल

‘नटसम्राट’ नाटक केलं असतं तर कदाचित मेलो असतो – नाना पाटेकर

HSRP नंबर प्लेट नसल्यास १ जुलैपासून दंडात्मक कारवाई!

धोकादायक व रेबीजग्रस्त भटक्या कुत्र्यांवर कठोर कारवाईला मान्यता; सार्वजनिक ठिकाणांहून हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम

देशात चिकनपॉक्स रुग्णसंख्येत वाढ; डॉक्टरांकडून सतर्कतेचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.