Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

प्रशिक्षणही आणि भत्ताही! ठाणेकरांसाठी नागरी संरक्षण विभागाचे ५ दिवसीय विनामूल्य प्रशिक्षण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 18, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
प्रशिक्षणही आणि भत्ताही! ठाणेकरांसाठी नागरी संरक्षण विभागाचे ५ दिवसीय विनामूल्य प्रशिक्षण
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण: महाराष्ट्र शासनाच्या ‘नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे’ यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ६ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान दुपारी १:०० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत नागरी संरक्षण नवी मुंबई समूह कार्यालय, आंबेडकर उद्यान समोर, तहसीलदार कंपाउंड, कल्याण (पश्चिम) या ठिकाणी ५ दिवसीय विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाद्वारे स्वयंसेवकांची नोंदणी केली जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना शासनाकडून विविध लाभ दिले जाणार आहेत.

प्रशिक्षणाचे मुख्य विषय :

या प्रशिक्षणात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महत्त्वपूर्ण धडे दिले जातील, ज्यात मुख्यत्वे:

  • रासायनिक (Chemical), जैविक (Biological), रेडिओलॉजिकल (Radiological) आणि अण्वस्त्र (Nuclear) संकटांपासून संरक्षण.
  • आगीवर नियंत्रण मिळवण्याचे तंत्र.
  • आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय मदत कशी द्यावी.

मिळणारे लाभ :

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या स्वयंसेवकांना खालील सुविधा मिळतील:
१. अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्र.
२. शासनाचे ओळखपत्र.
३. प्रशिक्षणाचा भत्ता थेट बँक खात्यात जमा केला जाईल.

पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे :

या प्रशिक्षणासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडणे अनिवार्य आहे:

  • आधार कार्ड (ठाणे जिल्ह्याचा रहिवासी पुरावा आवश्यक).
  • शैक्षणिक प्रमाणपत्र.
  • बँक पासबुकचे पहिले पान.
  • २ पासपोर्ट साईज फोटो.

अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी ०२५१ २३१७५७८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Previous Post

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार छत्रपती शंभूराजांच्या चरणी लीन!

Next Post

उबर आणि मेट्रोची हातमिळवणी; Uber ॲपवरून एका क्लिकवर मिळणार तिकीट

Next Post
उबर आणि मेट्रोची हातमिळवणी; Uber ॲपवरून एका क्लिकवर मिळणार तिकीट

उबर आणि मेट्रोची हातमिळवणी; Uber ॲपवरून एका क्लिकवर मिळणार तिकीट

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.