Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

१२१ कुटुंबियांच्या घरात पुन्हा आनंद! ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे लागला हरवलेल्या मुलांचा शोध

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 27, 2026
in गुन्हेगारी, पुणे
१२१ कुटुंबियांच्या घरात पुन्हा आनंद! ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे लागला हरवलेल्या मुलांचा शोध
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातून २०१८ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत २८६ बालके हरवली. त्यातील १२१ बालके शोधण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, २० जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत राबवलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवण्यात आले. यामध्ये बेपत्ता झालेल्या ७२ बालकांपैकी ५० बालकांना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राज्यात २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १८ वर्षांखालील हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान-१४ ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना याकामी विशेष सूचना दिल्या. या मोहिमेच्या अनुषंगाने सन २०१८ ते २० जानेवारी २०२६ या प्रलंबित कालावधीतील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, एकूण २१४ बालके (३० मुले आणि १८४ मुली) हरवल्याची नोंद होती.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष प्रयत्न करून यातील ७१ बालकांचा (११ मुले आणि ६० मुली) शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. तसेच, मोहिमेच्या प्रत्यक्ष कालावधीत म्हणजे २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान हरवलेल्या ७२ बालकांपैकी (२२ मुले आणि ५० मुली) ५० बालकांचा (१६ मुले आणि ३४ मुली) तातडीने शोध घेण्यात आला. ऑपरेशन मुस्कान-१४ अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण १२१ बालकांचा (२७ मुले आणि ९४ मुली) यशस्वीरित्या शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. राज्यात २०२५ मध्ये एकूण ४८ हजार २७८ महिल्या हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी २०२४ मध्ये ही संख्या ४५ हजार ६६२ इतकी होती. यात अल्पवयीन मुलींची संख्याही अधिक आहे. २०२५ आणि २०२४ मध्ये अनुक्रमे १२ हजार ११३ अल्पवयीन मुली आणि ११ हजार ३१६ इतक्या अल्पवयीन मुली हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हरविलेल्या एकूण महिल्यांपैकी २०२४ ला ३० हजार ८७७ आणि २०२५ मध्ये ३६ हजार ५८१ महिला मिळून आल्या आहेत.

Previous Post

मिस्टर आणि मिसेस देवरकोंडा!

Next Post

पुणे मेट्रोचा अजब कारभार! स्टेशन जवळचा बस थांबा दूर गेल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय

Next Post
पुणे मेट्रोचा अजब कारभार! स्टेशन जवळचा बस थांबा दूर गेल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय

पुणे मेट्रोचा अजब कारभार! स्टेशन जवळचा बस थांबा दूर गेल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.