वृत्तसंस्था : ६० जणांना घेऊन जाणारी बस पिकअपला धडकला अन् २०० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये ३७ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृताची संख्या वाढू शकते. बुधवारी दक्षिण पेरूमध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर एकच खळबळ उडाली.
अरैक्विपामधील अपघाताची माहिती मिळातच पोलीस आणि बचावपथकाने घटनास्थळावर धाव घेत तात्काळ मदकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. महामार्गावरील वाहतूक सुरूळीत करण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६० प्रवाशांना घेऊन जाणारी बस आणि पिकपची जोरात धडक झाली. या धडकेनंतर चालकाचा ताबा सुटला अन् बस २०० मीटर खोल दरीत कोसळली. दक्षिण पेरूमध्ये बुधवारी झालेला हा अपघात गेल्या काही दिवसातील दक्षिण अमेरिकन देशातील सर्वात घातक अपघातांपैकी एक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अपघातामध्ये आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २४ जण जखमी झाले आहेत,” असे अरेक्विपाचे प्रादेशिक आरोग्य व्यवस्थापक वॉल्टर ओपोर्टो यांनी सांगितले. लामोसास कंपनीद्वारे चालवली जाणारी ही बस कारावेली प्रांतातील चाल शहरातून अरेक्विपाकडे जात होती. त्यावेळी काळाने घाला घातला.

