Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महापालिका करणार पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 23, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
महापालिका करणार पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्त
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ६९९ थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. या मालमत्ताधारकांकडे ९६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, बिगर निवासी, मोकळ्या जागा अशा सात लाख ३२ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. चालू आर्थिक वर्षांत महापालिकेने एक हजार कोटींच्या पुढे कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत चार लाख ६० हजार मालमत्ताधारकांनी ५७० कोटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. चालू आर्थिक वर्षात जास्तीत-जास्त कर वसुली व्हावी, यासाठी कर संकलन विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत थकबाकीदारांच्या वसुलीबाबत चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पाच लाखांवरील थकबाकीदारांवर जप्ती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार २० सप्टेंबरपर्यंत मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत.

शहरात पाच लाखांवरील ६९९ थकबाकीदार आहेत. या मालमत्ताधारकांकडे ९६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विभागीय कार्यालयनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. सुरुवातीला थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्याबाबत समज देण्यात येणार आहे. त्यानंतरही मालमत्ता कर न भरल्यास प्रत्यक्ष मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले. कर संकलन विभागाचे १८ विभाग आहेत. यामध्ये चिखली विभागात सर्वाधिक १२८ थकबाकी असलेल्या मालमत्तांची संख्या आहे. त्यानंतर कस्पटे वस्ती ११७, वाकड ९१, थेरगाव ८२, मनपा भवन ५१, सांगवी ३०, पिंपरी वाघेरे २९, आकुर्डी २२, मोशी २०, भोसरी १८, चिंचवड ३५, किवळे ३४, फुगेवाडी दापोडी दहा, चऱ्होली आठ, दिघी बोपखेल आठ, निगडी प्राधिकरण सात, तळवडे पाच आणि पिंपरीनगर चार अशा पाच लाखांपुढे थकबाकी असलेल्या ६९९ मालमत्ता आहेत.

Previous Post

प्लास्टिकचा दंड भरला नाही म्हणून महापालिकेने दुकानदाराचा फ्रिज केला जप्त!

Next Post

ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालावी, औषध विक्रेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी

Next Post
ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालावी, औषध विक्रेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी

ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालावी, औषध विक्रेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.