Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालावी, औषध विक्रेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 25, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालावी, औषध विक्रेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ‘देशभरात सध्या ई- फार्मसी आणि क्वीक कॉमर्स मंचांवरून ऑनलाइन औषध विक्री सुरू आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अथवा बोगस चिठ्ठीच्या आधारे ही विक्री केली जात आहे. या बेकायदा औषध विक्रीवर बंदी घालावी,’ अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने (एआयओसीडी) केली आहे. याबाबत संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही पाठविले आहे.

देशभरातील औषध विक्रेत्यांची एआयओसीडी ही संघटना असून, तिचे १२ लाख ४० हजार सदस्य आहेत. ई-फार्मसी आणि क्वीक कॉमर्स मंचांवरून औषधांची बेकायदा विक्री सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या औषध विक्रीला स्थगिती दिली आहे. शेड्यूल एच, एच१, एक्स औषधे १० मिनिटांत ग्राहकांना घरपोच दिली जात आहेत. अशा औषधांसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता असते. तरीही चिठ्ठीशिवाय अथवा बोगस चिठ्ठीच्या माध्यमातून ही बेकायदा औषध विक्री सुरू आहे. यातून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असे संघटनेने केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत एआयओसीडी संघटनेचे अध्यक्ष जे. एस. शिंदे व सरचिटणीस राजीव सिंघल म्हणाले की, औषधे विक्रेत्यांकडून सर्व नियमांचे पालन करून व्यवहार केला जातो. याच वेळी ऑनलाइन मंच बेकायदा पद्धतीने औषध विक्री करीत असून, त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. यामुळे काही औषधांचा गैरवापर होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांनी वाढले आहे. टेलिमेडिसीनच्या मार्गदर्शक सूचनांचा गैरवापर करून ही ऑनलाइन विक्री सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदा औषध विक्रीवर तातडीने बंदी आणण्याची आवश्यकता आहे.

Previous Post

महापालिका करणार पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्त

Next Post

ठाण्यात विसर्जनसाठी ‘हरित विसर्जन’ अॅप, संकेतस्थळावर नोंदणी करून करता येणार सुलभ विसर्जन

Next Post
ठाण्यात विसर्जनसाठी ‘हरित विसर्जन’ अॅप, संकेतस्थळावर नोंदणी करून करता येणार सुलभ विसर्जन

ठाण्यात विसर्जनसाठी ‘हरित विसर्जन’ अॅप, संकेतस्थळावर नोंदणी करून करता येणार सुलभ विसर्जन

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.