Lokrakshanay
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

प्लास्टिकचा दंड भरला नाही म्हणून महापालिकेने दुकानदाराचा फ्रिज केला जप्त!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 23, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
प्लास्टिकचा दंड भरला नाही म्हणून महापालिकेने दुकानदाराचा फ्रिज केला जप्त!
Share on FacebookShare on Whatsapp

मिरारोड : प्लास्टिक पिशवी बाळगल्याप्रकरणी दंड भरू न शकलेल्या एका औषध दुकानदाराचा फ्रीज महापालिकेच्या सफाई पथकाने उचलून नेल्याची घटना मिरा रोड येथे घडली आहे. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून समाजमाध्यमांवर झपाट्याने व्हायरल होत आहे. मिरा भाईंदर शहरातील स्वच्छतेत भर घालावी आणि प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर आळा बसावा यासाठी महापालिकेने प्रभाग स्तरावर विशेष स्वच्छता पथक तयार केले आहे. या पथकाला पावती पुस्तिका आणि विशेष गणवेश प्रशासनाने दिला आहे. त्यानुसार हे पथक प्रभागातील विविध भागात जाऊन रस्त्यावर थुंकणारे, कचरा टाकणारे यांच्यावर कारवाई करते. तसेच प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांकडून दंड वसूल करण्याचे अधिकारही प्रशासनाने या पथकाला दिले आहेत.

शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रभाग क्रमांक ६ मधील एक पथक काशिमीरा येथील औषध दुकानात गेले. यावेळी दुकानदाराकडे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यावरून पथकाने दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र सकाळची वेळ असल्यामुळे दुकानदाराने तात्काळ दंड भरू शकत नसल्याचे पथकाला सांगितले. यावरून दुकानदार व पथक यांच्यात काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दंडाची रक्कम मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या पथकातील एका कर्मचाऱ्याने थेट दुकानदाराचा चॉकलेट व इतर साहित्य ठेवलेला फ्रीज उचलण्यास सुरुवात केली. याला इतर कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले आणि अखेर फ्रीज दुकानाबाहेर काढण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दुकानदार रामसिंग धनिया यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले असून संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी भाजप नेते रवि व्यास यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. तर या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन बांगर यांनी सदर प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Previous Post

“मराठी लोगो की औकात क्या है..”, परप्रांतीयाला मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला चोप

Next Post

महापालिका करणार पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्त

Next Post
महापालिका करणार पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्त

महापालिका करणार पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्त

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.