Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडकी सून योजना’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 18, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडकी सून योजना’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. अल्पावधीतच योजना प्रसिद्ध झाली आणि निवडणुकीत महायुतीला त्याचा लाभ झाला. महायुतीला निकालात घवघवीत यश मिळाले. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून अभियानाची घोषणा केली आहे. ठाण्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत असताना शिंदे यांनी ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात या अभियानाची सुरुवात केली. “आजपासून आपण नवीन अभियान सुरू करत आहोत. ते लाडक्या सुनेंसाठी महत्त्वाचे आहे. सासर काही वाईट नसते, पण काही मोजक्या ठिकाणी अप्रिय घटना घडत असतात. आपली मुलगी जशी लाडकी असते, त्याचप्रमाणे सूनही लाडकी व्हावी, यासाठी शिवसेनेने हेल्पलाईन सुरू केली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी हेल्पलाईनचे क्रमांकही जाहीर कार्यक्रमात सांगितले. ते पुढे म्हणाले, ज्या सुनांना अडचण येईल, त्यांनी न घाबरता या क्रमांकावर फोन करावा. त्यांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल. लाडकी सून अभियानामार्फत पीडित सूनेला सुरक्षा दिली जाईल. ज्या सूना आहेत, त्याही माझ्या लाडक्या बहिणी आहेत. एकनाथ शिंदे त्यांचा भाऊ आहे. कुणीही त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करेल, त्याची गाठ शिवसेनेशी आहे, हे मी सांगतो. ‘लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन’ या अभियानाची घोषणा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या आरोग्यासाठीही एक अभियान सुरू केल्याचे सांगितले. “महिला कुटुंबासाठी सर्व काही करतात, पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपली नियमित तपासणी करून घेण्यासाठी ठाणे मनपा आणि रोटरी क्लबच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’ सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी त्यांचा लाभ घ्यावा”, असे आवाहन त्यांनी केले.

Previous Post

गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात पोलिसांसह प्रदूषण मंडळाला कारवाईचे आदेश

Next Post

‘खाता डॉट कॉम’ ॲपवरून व्यापाऱ्याची ५४ वेळा ३२ लाख रुपयांची फसवणूक

Next Post
‘खाता डॉट कॉम’ ॲपवरून व्यापाऱ्याची ५४ वेळा ३२ लाख रुपयांची फसवणूक

‘खाता डॉट कॉम’ ॲपवरून व्यापाऱ्याची ५४ वेळा ३२ लाख रुपयांची फसवणूक

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.