Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

येरवडा कारागृहात कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींची एकत्रित चौकशी

याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपी आशिष मित्तलला रक्ताचे नमुने देण्यास सांगणारा अरुणकुमार देवनाथ सिंग याच्याविरोधात अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 5, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
येरवडा कारागृहात कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींची एकत्रित चौकशी
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दहा आरोपींची पोलिसांकडून कारागृहात जाऊन एकत्रितपणे चौकशी केली जाणार आहे. याबाबत तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी न्यायालयात अर्ज केला असून, विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी पोलिसांना चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मुलाच्या रक्ताच्या नमुने बदल प्रकरणात विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, पत्नी शिवानी (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डाॅ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारे अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, मोटारीतील सहप्रवासी मुलांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करणारे आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. बंगला क्रमांक ३, सोपानबाग सोसायटी, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. बेलवेडर सोसायटी, विमाननगर) आणि अरुणकुमार सिंग यांना अटक करण्यात आली होती. आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपी आशिष मित्तलला रक्ताचे नमुने देण्यास सांगणारा अरुणकुमार देवनाथ सिंग याच्याविरोधात अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात एकत्रित खटला चालविला जाणार आहे.

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करण्यासाठी डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना किती रक्कम दिली जाणार होती, तसेच आरोपींनी त्यांना काही आमिष दाखविले होते का? यादृष्टीने तपास करायचा आहे. सर्व आरोपींची येरवडा कारागृहात एकत्रित चौकशी करायची आहे, असा अर्ज न्यायालायत दाखल करण्यात आला.

Previous Post

बेकायदेशीर सुरु असलेल्या गुटखा विक्रीच्या गोदामावर पोलिसांचा छापा; ७ लाखांचा गुटखा जप्तसह तिघांना अटक

Next Post

उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा ईडी चौकशीला अनुपस्थित राहिला

Next Post
उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा ईडी चौकशीला अनुपस्थित राहिला

उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा ईडी चौकशीला अनुपस्थित राहिला

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.