Lokrakshanay
Monday, June 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

एम.एस. धोनीने विश्वचषक जिंकून देणारा षटकार मारला होता, MCA करणार आता त्या बाकड्यांचा लिलाव

२०११ च्या विश्वचषक फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी एमएस धोनीने मारलेल्या शानदार षटकाराबद्दल आजही चाहते बोलतात. आता या षटकारांबाबत एक खास बातमीसमोर आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 15, 2023
in क्रीडा
एम.एस. धोनीने विश्वचषक जिंकून देणारा षटकार मारला होता, MCA करणार आता त्या बाकड्यांचा लिलाव
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : भारत यंदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. याआधी, भारताने शेवटच्या वेळी विश्वचषकाचे आयोजन २०११ मध्ये केले होते, जेव्हा टीम इंडिया २८ वर्षांची प्रतीक्षा संपवून चॅम्पियन बनली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्र सिंग धोनीने मारलेला विजयी षटकार चाहत्यांच्या अजूनही लक्षात आहे. महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयी षटकाराचा चेंडू ज्या बाकड्यांवर पडला होता, आता त्या बाकड्यांचा लिलाव होणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यातील ४९ वे षटक टाकण्यासाठी चेंडू नुवान कुलसेकरा आला होता. षटकातील दुसऱ्याच चेंडूवर धोनीने त्याच्याच शैलीत षटकार ठोकला. धोनीच्या षटकाराचा चेंडू ज्या दोन बाकड्यावर पडला त्यांना ‘२०११ वर्ल्ड कप मेमोरियल सीट्स’ म्हणतात. असाच अहवाल यावर्षी एप्रिलमध्ये आला होता. या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपसाठी त्या बाकड्यांचा लिलाव करणार असल्याची माहिती एमसीएच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. जे लोक लिलाव जिंकतील त्यांना विशेष आदरातिथ्य पॅकेज दिले जाईल. वृत्तांवर विश्वास ठेवला तर या दोन बाकड्यांची किंमत करोडोंपर्यंत पोहोचू शकते.

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितले की, बाकड्यांवर कोणतेही स्मारक होणार नाही. या सीट्स एस धोनीच्या नावाने डिझाइन केल्या जातील आणि कायमचे एमएस धोनी सीट्स म्हणून ओळखले जातील. या बाकड्यांना सुशोभित करण्यात येणार असून या जागा सोफ्यासारख्या असतील. या सीटसाठी तुम्हाला खूप पैसे मोजावे लागतील. वर्ल्ड कप २०२३ साठी, एमसीए सचिन तेंडुलकरच्या लेव्हल डी च्या ३०० बाकडे ३ कोटी रुपयांना विकत आहे, तसेच सात बॉक्सच्या १४० सीट्स २.६६ कोटी रुपयांना विकणार आहे. विश्वचषकाचे पाच सामने मुंबईतील वानखेडे येथे होणार आहेत. गेल्या वेळी अंतिम सामना वानखेडेवर खेळला गेला होता, परंतु यावेळी विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Tags: क्रीडा
Previous Post

अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

…म्हणून आमदार अपात्रतेची सुनावणी लाईव्ह करा

Next Post
…म्हणून आमदार अपात्रतेची सुनावणी लाईव्ह करा

…म्हणून आमदार अपात्रतेची सुनावणी लाईव्ह करा

BreakingNews

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.