Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे…’, राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 15, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
‘पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे…’, राज ठाकरेंनी सरकारला सुनावले
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई  : मराठा आरक्षणासाठी मागच्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे. ‘सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो’, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांच्या उपोषणावरून राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.

या पत्रकार परिषदेला येत असताना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमधला संवाद रेकॉर्ड झाला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, यावरून राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं आहे.काय म्हणाले राज ठाकरे?’श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं.

पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे.गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा.सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो’, असं राज ठाकरे म्हणाले.व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरणहा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माध्यमांसोबत चर्चा करायला आलो. चर्चा करायला येत असताना आम्ही बोलत येत होतो, बैठकीत ज्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली त्या मुद्द्यावरच बोलूया, आज कोणतेही राजकीय प्रश्न नको, अशी आमच्यात चर्चा सुरू होती’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक पुढचे मागचे शब्द काढून मराठा समाजात संभ्रम निर्माण होईल, हे दाखवण्याचा प्रयत्न विघ्नसंतोषी लोक करत आहेत’, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Previous Post

अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची भूमिका ठरणार निर्णायक..

Next Post

मालवणच्या दांडी समुद्रात सापडला सोने अन् हिऱ्यापेक्षा मौल्यवान खजिना, आणि पोलीस यंत्रणा झाली अलर्ट

Next Post
मालवणच्या दांडी समुद्रात सापडला सोने अन् हिऱ्यापेक्षा मौल्यवान खजिना, आणि पोलीस यंत्रणा झाली अलर्ट

मालवणच्या दांडी समुद्रात सापडला सोने अन् हिऱ्यापेक्षा मौल्यवान खजिना, आणि पोलीस यंत्रणा झाली अलर्ट

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.