Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राजे आम्हाला माफ करा..! अजित पवार गटाची स्पष्ट भूमिका आणि मूक आंदोलन

अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे शहरातील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ बसून मूक आंदोलन करण्यात आले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 29, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
राजे आम्हाला माफ करा..! अजित पवार गटाची स्पष्ट भूमिका आणि मूक आंदोलन
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महायुती सरकार विरोधात राज्यभरात महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आज अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे शहरातील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ बसून मूक आंदोलन करण्यात आले. राजे आम्हाला माफ करा..! , राजे तुम्ही ३५० वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले शाबूत आहेत पण आत्ताचे पुतळे…! निष्क्रिय शासकीय यंत्रणांचा धिक्कार असो! या आशयाचे मजकूर असलेले फलक घेऊन कार्यकर्ते मूक आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी दीपक मानकर म्हणाले की, मागील आठ महिन्यापुर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण तीन दिवसांपूर्वी पुतळा कोसळण्याची घटना घडली आहे. यामुळे माझ्यासह देशभरातील सर्व शिवशक्तच्या मनात तीव्र नाराजी आणि दुसर्‍या बाजूला संताप व्यक्त होत आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले आज देखील सुस्थिती आहे. पण आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारलेला पुतळा कोसळतो. यावरून त्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे. तसेच आम्ही सरकारमध्ये असलो, तरी छत्रपती शिवाजी महाराज हे आमची पहिली अस्मिता आहे. त्यामुळे आम्ही आज मूक आंदोलन करित आहोत, आता राज्य सरकार यापुढील काळात पुतळा उभारताना विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या चौकशीसाठी टेक समिती स्थापन

Next Post

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post
प्रियकराकडून प्रेयसीचा विश्वासघात, बळजबरीने केला बलात्कार : गुन्हा दाखल

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.