Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून दोन महिन्यांत दिली आरोपीला फाशी : एकनाथ शिंदे

तीन चार महिन्यांपूर्वी बदलापूर सारखीच एक घटना घडलेली, त्यावेळी फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण गेलं, त्यानंतर दोन महिन्यांत आरोपीला फाशी देण्यात आली, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 22, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावर हल्ला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल आपले मत व्यक्त केले
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : बदलापूरच्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हळहळला. याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटल्याचे पाहायला मिळाले. बदलापूरच्या घटनेचं राजकारण केलं जातंय, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून सातत्यानं केला जातोय. तर विरोधकांनी या घटनेवरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता याच प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. तीन चार महिन्यांपूर्वी बदलापूर सारखीच एक घटना घडलेली, त्यावेळी फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण गेलं, त्यानंतर दोन महिन्यांत आरोपीला फाशी देण्यात आली, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. पण हे प्रकरण नेमकं कोणतं? अशी विचारणा आता मुख्यमंत्र्यांना होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “बदलापूर घटनेचं राजकारण केलं जात आहे. तीन चार महिन्यांपूर्वी अशीच एक घटना घडली. त्यावेळी प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं गेलं. आणि दोन महिन्यांत या आरोपीला फाशीची शिक्षा झाली…”

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अभिनेते किरण माने यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तुम्ही पाहिलं असेल काल मुख्यमंत्र्यांची बदलापूरच्या घटनेनंतर एक क्लिप व्हायरल झाली. मुख्यमंत्री असं सांगत आहे की, महाराष्ट्रात अशीच घटना घडली. पण, आम्ही ती फास्टट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली. माझा असा प्रश्न आहे की, मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली? कोणत्या न्यायालयासमोर हा घटना चालला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवले? कोणत्या कारागृहात या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली? यातला तपशील जाहीर करणे गरजेचे आहे. किरण माने यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की,  मुख्यमंत्री आज भाषणात म्हणाले, “चार महिन्यापुर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली.” इतकी जबरदस्त थाप मारलेली मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली ! कुणी सांगू शकेल का गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात कुणाला फाशीची शिक्षा झालेली आहे??? इतक्या संवेदनशील विषयावर अशी थापेबाजी करणारा नराधम ‘माणूस’ म्हणवुन घ्यायच्या लायकीचा नाही…”

 

Previous Post

आर्थिक वादातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, चालत्या ट्रेनखाली संपवले आयुष्य

Next Post

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; शाळा आणि पोलिसांवर पालकांनी केला आरोप

Next Post
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; शाळा आणि पोलिसांवर पालकांनी केला आरोप

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; शाळा आणि पोलिसांवर पालकांनी केला आरोप

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.