Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आर्थिक वादातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, चालत्या ट्रेनखाली संपवले आयुष्य

आर्थिक वादातून तरुणाने धावत्या रेल्वेगाडी खाली उडून मारुन आत्महत्या केल्याची घटना खडकी रेल्वे स्थानक परिसरात घडली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 21, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
आर्थिक वादातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, चालत्या ट्रेनखाली संपवले आयुष्य
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : आर्थिक वादातून तरुणाने धावत्या रेल्वेगाडी खाली उडून मारुन आत्महत्या केल्याची घटना खडकी रेल्वे स्थानक परिसरात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पाचजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऋषीकेश जयदेव म्हसारे (वय २७, रा. इनामदारनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आनंद दंडनाईक, बालाजी बहिरवाल, गणेश बिबिनवरे, प्रशांत कदम, विकास कसबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ऋषीकेशचे वडील जयदेव रामदास म्हसारे (वय ५८) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषीकेश याने ओैषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम केला होता. तो एका ओैषध विक्री दुकानात कामाला होता. आरोपी दंडनाईक, बहिरवाल, बिबिनवरे, कदम, कसबे ओैषध विक्री दुकानात कामाला होता. त्याने त्यांच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. दरमहा त्यांना तो पैसे परत करत होता. आरोपींनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केल्याने तो नैराश्यात होता, असे ऋषीकेशचे वडील जयदेव म्हसारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपींच्या त्रासामुळे तो १ जून रोजी घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर ऋषीकेशने खडकी रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेगाडी खाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. दरम्यान, ऋषीकेशच्या आई-वडिलांशी लोहमार्ग पोलिसांनी संपर्क साधला. बेपत्ता झालेल्या मुलाची त्यांनी ओळख पटविली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने वडिलांच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता. आरोपींच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने संदेशात म्हटले होते. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला, असे बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक मोढवे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

बदलापूर प्रकरणाबाबत; शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

Next Post

फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून दोन महिन्यांत दिली आरोपीला फाशी : एकनाथ शिंदे

Next Post
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावर हल्ला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल आपले मत व्यक्त केले

फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून दोन महिन्यांत दिली आरोपीला फाशी : एकनाथ शिंदे

BreakingNews

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.