Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बदलापूर प्रकरणाबाबत; शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

सुषमा अंधारे म्हणाल्या की जर आरोपीचं नाव अकबर शेख, खान असतं तर?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 22, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
बदलापूर प्रकरणाबाबत; शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य
Share on FacebookShare on Whatsapp

बदलापूर : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार एका नामांकित शाळेत घडला. या शाळेबाहेर आणि रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. बदलापूरमध्ये जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे. आता यावरुन राजकीय आरोप होत आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ही शाळा भाजपाच्या लोकांशी संबंधित आहे असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. या दोन्ही मुली अत्यंत कोवळ्या वयातल्या आहेत. शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं आहे. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी बदलापूरकर मंगळवारी रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणात आता सुषमा अंधारे म्हणाल्या की जर आरोपीचं नाव अकबर शेख, खान असतं तर?

“देवेंद्र फडणवीस हे मागच्या दहा वर्षांमध्ये साडेसात वर्षे गृहमंत्री आहेत. ज्या पालकांनी न्याय मागितला त्यांच्यावर गुन्हा दाखल करता? तो वामन म्हात्रे महिला पत्रकारावर घाणेरडी कमेंट करतो, त्याला माफ करता? अपेक्षा करता की लोकांनी शांत बसावं?” असे प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारले आहेत. “अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख, खान असता, तर नितेश राणेने थयथयाट केला असता. हलकटपणा आहे, तुम्ही जात, धर्म पक्ष बघून व्यक्त होता” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. “बदलापूरच्या घटनेत न्याय मिळाला असता, तर लोक रस्त्यावर का आली असती? पोलीस कमिशनर डुमरेंना प्रकरण नीट हाताळता आलं नाही. लोक का संतप्त झाले? आशुतोष डुमरेंचं काय करणार ?” असे प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं असा आरोप केला आहे. बदलापूरमध्ये सुमारे नऊ तास झालेलं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते म्हणाले की, मंगळवाराच्या आंदोलनामुळे दुर्दैवाने लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. हे व्हायला नको होतं. परंतु मंगळवारी झालेलं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होतं. इतक्या जलदगतीने गाड्या भरून बाहेरून लोक आले. आंदोलकांना मंत्र्यांनी समजावलं, सगळ्या मागण्या मान्य केल्या. तरीही ते माघार घेत नव्हते. त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. राजकारण करायला अनेक मुद्दे आहेत. लहान मुलीचे राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना आंदोलनावरुन सुनावलं आहे.

Previous Post

बदलापुरात मुलींचं लैंगिक शोषण, लोकांनी 10 तास रेल्वे मार्ग रोखून धरला, नागरिकांचे रौद्ररूप

Next Post

आर्थिक वादातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, चालत्या ट्रेनखाली संपवले आयुष्य

Next Post
आर्थिक वादातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, चालत्या ट्रेनखाली संपवले आयुष्य

आर्थिक वादातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, चालत्या ट्रेनखाली संपवले आयुष्य

BreakingNews

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.