Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एमएमआरसीकडून वृक्षारोपणासाठी ३ कंत्राटे; मेट्रो स्थानकांचा परिसर होणार हिरवागार

आता इतर स्थानकांजवळ २६०० झाडे लावण्यात येणार आहेत. एमएमआरसीने मुळ जागी वृक्षारोपण करण्यासाठी तीन कंत्राटे दिली आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 6, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
एमएमआरसीकडून वृक्षारोपणासाठी ३ कंत्राटे; मेट्रो स्थानकांचा परिसर होणार हिरवागार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील १३ स्थानकांजवळ ५०० झाडे लावली असून आता आणखी २६०० झाडे लावण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. त्यामुळे आता ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील स्थानकांचा परिसर हिरवागार होणार आहे. एमएमआरसीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या हमीपत्रानुसार ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील स्थानक परिसरात झाडे लावण्यास सुरुवात केली आहे. सीप्झ, एमआयडीसी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. आता इतर स्थानकांजवळ २६०० झाडे लावण्यात येणार आहेत. एमएमआरसीने मुळ जागी वृक्षारोपण करण्यासाठी तीन कंत्राटे दिली आहेत.

नियुक्त केलेल्या कंत्राटदारांवर रोपवाटीकेत रुजलेल्या झाडांचा पुरवठा, लागवड आणि देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या झाडांची मुळ जागी लागवड करण्यात येत आहे. साधारण सात वर्ष वयोमान असलेली आणि १५ फूट उंचीची फुलझाडे, शोभेची झाडे, सदैव हिरवीगार राहणाऱ्या झाडांची लागवड करण्यात येत आहे. मुळ जागी वृक्षारोपण मोहिमेसाठी निवडलेल्या वृक्षांच्या प्रजातींमध्ये महोगणी, बकुळ, पिंपळ, सोनचाफा, निलमोहोर, तामण, कदंब, देशी बदाम, आकाश नीम, स्पाथोडिया, ताबेबुया, अम्ब्रेला-वृक्ष, सप्तपर्णी, पिंपळ, पांगारा, जंगली बदाम, चाफा, आदींचा समावेश आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे, तीन वर्ष देखरेख, नियमित सिंचन आणि बागायती पद्धतीने संवर्धन करण्याची जबाबदारी त्याच कंत्राटदारांवर आहे.

Previous Post

कल्याणमधील शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी

Next Post

५७ लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ; २३९ ‘आपला दवाखाना’ मुंबईत सुरू

Next Post
५७ लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ; २३९ ‘आपला दवाखाना’ मुंबईत  सुरू

५७ लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ; २३९ ‘आपला दवाखाना’ मुंबईत सुरू

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.