Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

५७ लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ; २३९ ‘आपला दवाखाना’ मुंबईत सुरू

खासगी निदान केंद्रांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या दरात एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय या सेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 7, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
५७ लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ; २३९ ‘आपला दवाखाना’ मुंबईत  सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध करणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची’ संख्या २३९ झाली असून, आतापर्यंत या दवाखान्यांमध्ये तब्बल ५७ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. प्रस्तावित २५० दवाखान्यांपैकी २३९ दवाखाने सुरू झाले असून उर्वरित ११ दवाखाने लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईकरांना घराजवळच अधिकाधिक सुलभरित्या आणि मोफत उपचार देण्यासाठी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी पहिला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्याने ६ जून २०२४ पर्यंत आपला दवाखान्यांची संख्या २३९ वर पोहोचली. यामध्ये ३३ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर, ८१ पोर्टा केबिन, १०८ उपलब्ध दवाखाने आणि १७ रेडी स्ट्रक्चरमधील दवाखाने आहेत. आपला दवाखान्यांतून आतापर्यंत ५७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. त्यात आपला दवाखान्यात ५६ लाख ४६ हजार ९९४ रुग्णांनी उपचार घेतलेअसून १ लाख ३६ हजार ७५७ लाभार्थ्यांनी पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरचा लाभ घेतला. येत्या काही दिवसांत महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘शुन्य औषध चिठ्ठी’ धोरण राबविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. खासगी निदान केंद्रांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या दरात एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय या सेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. पोर्टा केबिन आणि रेडी स्ट्रक्चर १३ दवाखाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत, तर ९८ दवाखाने दुपारी ३ ते रात्री १० दरम्यान सुरू असतात. त्याचप्रमाणे नियमित १०८ दवाखाने दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत मुंबईकरांसाठी खुले असतात.

आपला दवाखान्यांतून मुंबईकरांना मिळतात या सुविधा 

मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार, रक्त चाचण्या, फिजिओथेरेपी सेंटर, पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दंतचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय चिकित्सक, त्वचारोगतज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांमार्फत मोफत सल्ला

Previous Post

एमएमआरसीकडून वृक्षारोपणासाठी ३ कंत्राटे; मेट्रो स्थानकांचा परिसर होणार हिरवागार

Next Post

पिंपरी चिंचवड सायबर सेलची कारवाई; २० कोटीचा सायबर गंडा घालणारे ८ आरोपी अटकेत

Next Post
सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार, ‘ऑनलाइन टास्क’पासून सावधान!

पिंपरी चिंचवड सायबर सेलची कारवाई; २० कोटीचा सायबर गंडा घालणारे ८ आरोपी अटकेत

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.