Lokrakshanay
Thursday, June 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

एक्स्प्रेसची साखळी खेचणाऱ्या महिलेवर गुन्हा; कल्याण स्थानकांतील प्रकार

मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेसने जाण्यासाठी एक महिला आई-वडील आणि दोन मुलांसह निघाली होती. इंडिकेटरवर दाखवलेल्या ठिकाणी हे कुटुंब थांबले होते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 6, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
एक्स्प्रेसची साखळी खेचणाऱ्या महिलेवर गुन्हा; कल्याण स्थानकांतील प्रकार
Share on FacebookShare on Whatsapp

 ठाणे : कल्याण स्थानकातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या फलाटावर जिथे थांबणे अपेक्षित असते, तिथे त्या अनेकदा थांबत नाहीत. इंडिकेटरवर दाखवलेल्या जागी बोगी येत नसल्याने प्रवाशांची धावपळ होते. असाच एक प्रकार कल्याण स्थानकात घडला. अशा धावपळीत एका प्रवासी महिलेने एक्स्प्रेसची साखळी ओढल्याने या महिलेला गाडीतून उतरवण्यात आले. यावेळी तिने गोंधळ घातल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेसने जाण्यासाठी एक महिला आई-वडील आणि दोन मुलांसह निघाली होती. इंडिकेटरवर दाखवलेल्या ठिकाणी हे कुटुंब थांबले होते. मात्र, प्रत्यक्षात गाडीची बोगी मागे राहिल्याने ते सर्वजण सामान घेऊन पळाले. मात्र, गाडी सुटण्याच्या भीतीने महिलेने दीड वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन समोर दिसेल, त्या बोगीत प्रवेश केला, तर तिचे वडील तिच्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन बोगीपर्यत धावत गेले. ते गाडीत चढले किंवा नाही हे कळण्याआधीच गाडी सुटल्याने ती घाबरली आणि तिने गाडीची साखळी ओढली. यामुळे गाडी थांबल्याने आरपीएफ आणि रेल्वे पोलिस बोगीत दाखल झाले.

साखळी ओढल्याने लोकल विलंबचा ठपका ठेवत या महिलेला खाली उतरवण्यात आले. मात्र, वडील आणि मुलगी गाडीतच राहिली. यानंतर या महिलेने त्यांना गाडीतून उतरवण्याची मागणी केली. मात्र, पोलिस त्याकडे लक्ष देत नसल्याने तिने स्थानकात वाद घालत गोंधळ घातला. यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. यादरम्यान या महिलेने वडिलांशी संपर्क करत, त्यांना कसारा स्थानकात उतरण्यास सांगितले. आता पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असला, तरी रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे आपले हजारो रुपयाचे वातानुकुलीत प्रवासाचे तिकीट वाया गेल्याने झालेला भुर्दंड कोण भरून देणार, असा प्रश्न या महिलेने केला आहे.

Previous Post

२१ लाखांची गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

Next Post

मालमत्ताधारकांनो २५ मे पूर्वी करभरणा करा दंडात्मक कारवाई टाळा; मुंबई मनपाचे आवाहन

Next Post
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत

मालमत्ताधारकांनो २५ मे पूर्वी करभरणा करा दंडात्मक कारवाई टाळा; मुंबई मनपाचे आवाहन

BreakingNews

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

हॉटेल्समध्ये मिनरल वॉटरची सक्ती बंद! मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – तुकाराम मुंढेंचे आदेश

महाराष्ट्राची डिजिटल झेप : नागरिकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाकडे वाटचाल

पगार हवाय? मग आधी ई-केवायसी करा! जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा

शाळा सुरू, पण दप्तर मिळेना! महापालिकेच्या विद्यार्थ्यांची ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.