Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी; पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’

पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला पुरवठा आहे तेवढाच राहिल्याचा थेट परिणाम पाणीपुरवठा विस्कळीत होण्यावर झाला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 10, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी; पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला पुरवठा आहे तेवढाच राहिल्याचा थेट परिणाम पाणीपुरवठा विस्कळीत होण्यावर झाला आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल ४०० तक्रारींची नोंद महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे झाली असून गेल्या चार दिवसांत तक्रारींचे प्रमाण सरासरी ३५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान, टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याच्या काळ्याबाजारासंदर्भात दोन तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिदिन १,६५० ते १,७०० दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेतले जात आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत प्रतिदिन ८० ते १०० दशलक्ष लिटर अधिकचे पाणी महापालिका धरणातून उचलत आहे. पाणी जास्त उचलल्यावर पुरवठा व्यवस्थित व्हावा, अशी अपेक्षा असताना शहरातील अनेक भाग तहानलेलेच असल्याचे चित्र आहे. त्यात गेल्या चार दिवसांपासून आणखी भर पडली आहे.

विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली आहे. फुरसुंगी, उरूळी, हडपसर, वडगावशेरी, पाषाण, औंध, धनकवडी, सुखसागरनगर, बालाजीनगर, आंबेगाव, धायरी, नऱ्हे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ‘पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांत ४०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली असली तरी धरणातून वाढीव पाणी घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. विस्कळीत पाणीपुरवठा होत असलेल्या भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे,’ अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली. दरम्यान, टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी टँकरद्वारे होत असलेल्या पाण्याचा काळाबाजार होत आहे. महापालिका प्रशासनाकडूनही तशी कबुली देण्यात आली आहे. यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी महापालिकेने नि:शुल्क दूरध्वनी सेवा सुरू केली आहे. त्यावर आत्तापर्यंत अवघ्या दोन तक्रारी आल्या आहेत. त्या फुरसुंगी आणि कळस या भागातून आल्या आहेत. मात्र, त्यामध्ये योग्य तपशील देण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांना योग्य तपशील देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर या टँकरचालकांवर कारवाई होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Previous Post

शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त; मनपा आय प्रभागाची कारवाई

Next Post

बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर, अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच; गर्दीचा मुंबईकरांना फटका

Next Post
वांद्रे – कुर्ला दरम्यान धावणार बस; १० विद्युत दुमजली बस बेस्टच्या ताफ्यात दाखल

बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर, अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच; गर्दीचा मुंबईकरांना फटका

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.